"शिक्षण विभाग पंचायत समिती झरी यांच्या संकल्पनेतून साकारला यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा."


निकेश पत्रकार | सह्याद्री चौफेर 

झरी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवन अतिशय गतीमान होत चालले आहे. बदलत्या युगात ज्यांनी स्वतःमध्ये बदल केला ते प्रवाहात टिकले व ज्यांनी बदल स्विकारला नाही. अशा बाबी मात्र काळाच्या पडद्याआड लुप्त झाल्या.

मानवाला यशोशिखरावर पोहोचायचे असेल तर, त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची,पराकोटीच्या जिद्दीची व चिकाटीची,उच्चतम महत्वाकांक्षेची गरज असते. विकासाला पुरक असलेली मानवी सचोटी केवळ स्पर्धेच्या सहाय्याने प्राप्त करता येते.शहरातील वातावरण व तेथील पुरक परीस्थिती ह्यामुळे शहरी विध्यार्थी स्पर्धेच्या प्रवाहात सहजच सामील होतो. याउलट ग्रामीण भागातील विद्यार्थी परिस्थितीच्या अभावामुळे दिवसा गणिक मागे पडतो. त्यामुळे मनात न्यूनगंड निर्माण होऊण स्पर्धेतून अलगद बाहेर फेकला जातो. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विध्यार्थी स्पर्धेच्या प्रवाहात टिकावेत ह्या करिता जडण घडणी सोबतच स्पर्धात्मक युगाचे बाळकडू त्याला दिल्यास भविष्यात जि. प. शाळेचा विध्यार्थी स्पर्धेत मागे पडणारच नाही. हया विचाराने ध्येयवेडे होवून,जि.प.यवतमाळचे शिक्षणाधिकारी मा.सूर्यवंशी साहेब ह्यांनी "महादिप " ह्या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परिक्षेस सुरूवात केली व हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविला.

विविध उपक्रमाच्या माध्यमातून संवेदनशील भागातील दुर्लक्षित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सतत प्रयत्न करणारे उपक्रमशिल गटशिक्षणाधिकारी मा. नगराळे साहेब व मानवतावादी द्दृष्टी जपणारे विध्यार्थीप्रीय गटविकास अधिकारी मा.मुंडकर साहेब यांनी मा.केंद्रप्रमुख व गटसाधन व्यक्ती सर्व मान्यवर मुख्याध्यापक व नवोपक्रमशील शिक्षक यांच्या सहकार्याने "महादिप" ह्या स्तुत्य उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली. त्या मुळे झरी सारख्या अतिदुर्गम तालुक्यातून तब्बल २१ विध्यार्थी जिल्हा स्तराकरिता निवडल्या गेले. ह्या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या यशस्वीते करिता अपार मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचा प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देवून सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.

"महादिप" उपक्रमा करिता प्रश्नावली तयार करून नंतर झटणारे सौ.सुरेखा ठाकरे मॅम पंचायत समिती पांढरकवडा,सौ.आशालता कोवे मॅम पंचायत समिती वणी व श्री.कैलास गव्हाणकर सर यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते शाल-श्रीफळ,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.'आपल्या पंचायत समितीमधील ८९ शाळा कोरोणा काळात सुध्दा अखंडपणे सुरू होत्या. आमचा शिक्षकवर्ग विध्यार्थी हिताचे कार्य निरंतरपणे करत होता. त्यामुळे विध्यार्थी आजही शाळेशी कायमचा जुळून राहू शकला. म्हणूनच आज संपूर्ण तालुक्यातून एवढ्या उत्तम प्रकारे विद्यार्थी स्पर्धेत निडरपणे उतरू शकला. 'असे मत आपल्या प्रास्ताविक भाषणातून सन्माननीय नगराळे साहेब ह्यांनी व्यक्त केले. यवतमाळ येथून आलेले सन्माननिय काठोळे सर ह्यांनी, झरीतील शैक्षणिक प्रगती बाबत व शिक्षकांच्या बदल्या तथा पदोन्नती बाबत आपल्या भाषणातून माहिती विषद केली. "स्पर्धा ही मानवी जीवनातील एक नसंपणारी बाब आहे." असे मत शिक्षक सत्कारमूर्ती मा.शंकर केमेकार सर ह्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केले."आमच्या मनात सकारात्मक उर्जा भरण्याचे काम मा.मुंडकर साहेब व नगराळे साहेब निरंतर करतात परंतु मा मुंडकर साहेबांच्या बदली मुळे आम्ही पोरके होवू.आपणास शक्य असल्यास दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी आपली बदली रद्द करुन बघा" अशी आर्त हाक माननिय पोलचेट्टीवार सर यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केली. ह्या शब्दांनी क्षणभर सभाग्रुहातील प्रत्येक मुख्याध्यापकाच्या मनात भावनिक लहर निर्माण झाली व प्रत्येकाच्या मनपटलावर मा.मुंडकर साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या विविधशैक्षणिक कार्याची प्रतिमा उमटली. श्रीकांत काळे सर ह्यांनी आपल्या गायनाने उपस्थितांचे मन प्रफुल्लित केले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन हर्षदा चोपणे मॅम ह्यांनी तर आभारप्रदर्शन श्री मोहन काटकर सर ह्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा.नगराळे साहेब यांच्या मार्गदर्शनात केंद्रप्रमुख सर्वश्री कुळसंगे सर,चुधरी सर,विनोद मडावी सर,पोलचेट्टीवार सर,सहारे सर,काटकर सर,यमसनवार सर, गजानन आकुलवार सर,मुंडाले मॅम,वांढरे सर,भोयर सर,वाईकर सर व सर्व गटसाधन व्यक्ती पंचायत समिती झरी यांनी परिश्रम घेतले.

मा.कुरेकर सर ह्यांनी सर्व मुख्याध्यापकांना (U-dise) प्रपत्रामध्ये नव्याने समावेशीत करण्यात आलेल्या घटका बाबत सखोल मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित मुख्याध्यापकांच्या सहकार्याने सत्काराच्या कार्यक्रमाला सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.
"शिक्षण विभाग पंचायत समिती झरी यांच्या संकल्पनेतून साकारला यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा." "शिक्षण विभाग पंचायत समिती झरी यांच्या संकल्पनेतून साकारला यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा." Reviewed by सह्याद्री चौफेर on April 28, 2022 Rating: 5
Powered by Blogger.