कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : वनोज देवी विविध कार्यकारी संस्थेवर शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मिळून शेतकरी विकास आघाडी ची स्थापना करून ३० मार्च ला निवडणूक लढवली,त्यात शेतकरी विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आज गुरुवार (ता.२८) एप्रिल रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी खरेदी विक्री मारेगाव येथे पाचरण करण्यात आले. यात शिवसेनेचे गोवर्धन टोंगे हे अध्यक्ष तर काँग्रेसचे मारोती नगराळे यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच
संचालक मंडळ बंडू पुनवटकर, शंकर वैद्य, रामभाऊ पिदूरकर, किशोर धांडे, प्रभाकर ढवळे, टिवलू टोंगे, उमेश राजूरकर, आनंदराव घोटकर, रवींद्र धांडे, शोभा नागपुरे, जाई टोंगे आदींचा समावेश आहे. हे सर्व आनंदी वातावरणात घडवून आणण्यासाठी पराकाष्ठा नेतृत्वाला करावी लागली, हे विशेष...
त्याकरिता गोवर्धन टोंगे, प्रशांत भंडारी, उपसरपंच जनार्दन गाडगे, गंगाधर कडुकर, संभाजी बहिरे, प्रकाश पिदूरकर, संदीप भोपरे, विजय बोढाले इत्यादीचे खूप मोठे योगदान लाभले.
यावेळी निवडणूक अधिकारी इंगोले साहेब, भाऊराव काळे, सचिव यांचे यांचे मार्गदर्शनात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड शांततापूर्ण व बिनविरोध संपन्न झाली.
वनोजा (देवी) सोसायटी वर शिवसेना - काँग्रेस आघाडीचा झेंडा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 28, 2022
Rating:
