दारव्हा येथे मा.आ संजयभाऊ राठोड यांची पाणीटंचाई निवारणार्थ आढावा सभा सपन्न


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : येथील शासकीय विश्रामगृह येथे दारव्हा दिग्रस नेर मतदार संघाचे लाडके आमदार मा.संजय भाऊ राठोड माजी वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दारव्हा तालुक्यातील पाणी टंचाई निवारणार्थ आढावा सभा घेतली यावेळी दारव्हा तालुक्यातील सर्व गावांमध्ये शासनाच्या विविध योजनेतून जसे राष्ट्रीय पंप योजना जल जीवन मिशन खनिज विकास निधी जिल्हा नियोजन निधी तसेच संपूर्ण तालुक्यात सद्यस्थितीत चालू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला व पाणी टंचाई निवारणार्थ सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात व समस्त तालुक्यातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा अशा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी सौ.कालींदाताई पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा,श्रीधर मोहोड माजी शिक्षण व आरोग्य सभापती, सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी दारव्हा, सुभाष जाधव तहसीलदार, राजीव शिंदे गटविकास अधिकारी दारव्हा,उपविभागीय अभियंता पाणीपुरवठा कवाडे साहेब, महावितरणचे कवाडे साहेब, डी.वा. ई.राठोड साहेब, माजी पंचायत समिती सभापती सौ.सुनीता राऊत, उपसभापती नामदेव जाधव,माजी उपसभापती सौ.उषाताई चव्हाण, शहर प्रमुख राजू दुधे तथा हरिभाऊ लिंगणवार व समस्त पटवारी, सचिव सरपंच,उपसरपंच व समस्त पदाधिकारी उपस्थित होते.
दारव्हा येथे मा.आ संजयभाऊ राठोड यांची पाणीटंचाई निवारणार्थ आढावा सभा सपन्न दारव्हा येथे मा.आ संजयभाऊ राठोड यांची पाणीटंचाई निवारणार्थ आढावा सभा सपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on April 30, 2022 Rating: 5
Powered by Blogger.