टॉप बातम्या

शेख बब्बुभाई उमरा (हज) वरून परतले

योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : मुस्लीम धर्मात प्रत्येक बालींग व्यक्तीला रोजे ठेवणे, पाच वेळा नमाजचे पठण करणे, पाच कलम्यांचे पठण करणे, जकात देणे (दानधर्म करणे) आणि आयुष्यात एकदा तरी पवित्र हज किंवा उमरा यात्रा करावी अशी बंधने आहे.

पवित्र हज किंवा उमरा ला जावे अशी प्रत्येक मुस्लीम बांधवांची इच्छा असते. याच इच्छेतून पुलगाव येथील जाकीर कॉलनी मधील रिजविया ताज मदिना मजीद चे अध्यक्ष शेख बब्बु यांनी उमरा ला जायचे ठरवले. शेख बब्बु ता. ३ मार्च ला उमरासाठी मक्का व मदिना येथे गेले.

उमरासाठी लागू असणारा संपूर्ण विधी पार पाडून पंधरा दिवसांनंतर मक्का वरून नागपूर येथे शनिवारी दुपारी ३:०० वाजता उतरले. नागपुर वरून पुलगाव येथे संध्याकाळी ५:३० वाजता त्यांचे राहते घरी आले.

पुलगाव येथील आपुलकीच्या लोकांनी व नातेवाईकांनी त्यांचे गळ्यात हार टाकून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
Previous Post Next Post