नाटक हे साहित्याचा अविभाज्य घटक आहेत तसेच ते समाजातील वास्तव चित्रण करणारे प्रभावी माध्यम आहे,मा.प्रा.टिकाराम कोंगरे यांचे प्रतिपादन

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : नाटक हे साहित्याचा अविभाज्य घटक आहेत तसेच ते समाजातील वास्तव चित्रण करणारे प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन आज शेतकरी मंदिर वणी येथे अंजना उत्तम बहूउद्देशिय संस्थने आयोजित केलेल्या "क्षण" एक पुरे.. या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त नाटकातील कलावंतांच्या सत्काराप्रसंगी मा.प्रा.टिकाराम कोंगरे अध्यक्ष यवतमाळ मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँक बोलत होते.
यावेळी पुरस्कार विजेते जेष्ठ रंगकर्मी अशोक सोनटक्के आणि कु.राधा सोनटक्के यांचा सत्कार करण्यात आला तसेच नाट्य निर्माते प्राचार्य हेमंत चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला सोबत नाटकातील सहकलावंताचा भव्य सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ मोरेश्वर पावडे माजी जिल्हा परिषद सभापती होते,प्रमुख अतिथी श्री लक्ष्मणराव इद्दे सर आणि या संस्थेच्या सचिव सौ प्रणिता हेमंत चौधरी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ सुनंदा इद्दे,संस्थेचे कोषाध्यक्ष श्री भुमारेड्डी बोदकुरवार सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री उमाकांत म्हसे सर यांनी केले तसेच आभार प्रा.सिमा सोनटक्के यांनी केले.

कार्यक्रमाला वणीतील बहूसंख्य नाट्य रसिक उपस्थित होते.
नाटक हे साहित्याचा अविभाज्य घटक आहेत तसेच ते समाजातील वास्तव चित्रण करणारे प्रभावी माध्यम आहे,मा.प्रा.टिकाराम कोंगरे यांचे प्रतिपादन नाटक हे साहित्याचा अविभाज्य घटक आहेत तसेच ते समाजातील वास्तव चित्रण करणारे प्रभावी माध्यम आहे,मा.प्रा.टिकाराम कोंगरे यांचे प्रतिपादन Reviewed by सह्याद्री चौफेर on March 20, 2022 Rating: 5
Powered by Blogger.