विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

प्रशांत चंदनखेडे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील बुरांडा येथील शेतकऱ्याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल १९ मार्चला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गजानन नागोजी वासेकर (५५) रा. बुरांडा (खडकी) असे या आत्महत्या केलेल्या कास्तकाराचे नाव आहे. तो बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने त्याचा कुटुंबीयांनी शोध घेतला असता तो शेतात निपचित पडून दिसला. त्याच्या तोंडाला फेस आलेला असल्याने त्याने विष प्राशन केल्याचा कुटुंबीयांना संशय आला. त्याला आधी मारेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला वणी येथील खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. परंतु विष संपूर्ण शरीरात पसरल्याने त्याला ग्रामीण रुग्णलयात हलविण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. ग्रामीण रुग्णालयात दाखल करताच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. पण सततच्या आत्महत्यांनी तालुका मात्र हादरला आहे.
विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on March 20, 2022 Rating: 5
Powered by Blogger.