टॉप बातम्या

शाळेचा दरवाजा तोडून सळाखी केल्या लंपास

योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : मुकूटबन येथील जिल्हा परिषद शाळेत दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने मुख्याध्यापक यांच्या कार्यालयातील दोन कपाटचे लॉक तोडून कपाटातील शालेय गणवेष, खडू व ईतर सामानाची नासधूस केली.

शनिवारी सकाळी शाळेत जाताच ही घटना मुख्याध्यापक गजानन कुरेवार याना दिसली त्यावरून शाळा समितीचे अध्यक्ष राजू तुनकीवार, रमेश उदकवार शिक्षक गजानन बरशेट्टीवार, माधव उदार, शंकर बोबाटे यांना ही माहीती दिली.

चोरट्याने सिमेंट काँक्रीटच्या प्लेट फोडून त्यातील १२०० रुपयाची लोखंडी सळाखी चोरट्याने चोरून नेल्या तर ५०० चे नुकसान केल्याची तक्रार मुकूटबन पोलीस स्टेशनला दिली यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३७९, ४६१ व ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Previous Post Next Post