टॉप बातम्या

शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जल जागृती सप्ताह साजरा


शंकर घुगरे | सह्याद्री चौफेर 

वणी : महाराष्ट्र राज्य शासन निर्णय जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य च्या निर्णयानुसार सोळा मार्च ते बावीस मार्च जलसंवर्धन सप्ताह चे आयोजन एस.पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले.

यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जल हेच जीवन आहे "save the water save the life"
पाण्याचे महत्व पटवून सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री क्षीरसागर सर उप प्राचार्य श्री तामगाडगे सर उपस्थित होते श्री बुजोने सर यांनी यांनी जल प्रतिज्ञा सादर केली व मागून विद्यार्थांनी ती प्रतिज्ञा समुहाने म्हटली.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बुजोने सर यांनी केले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post Next Post