ग्रामपंचायतचे ब्लॉक तोडून वाढीव बांधकाम करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा - योगेश मडावी यांची मागणी


सह्याद्री चौफेर | न्यूज 

झरी : माथार्जुन ग्रामपंचायतचे हद्दीतील ग्रामपंचायतचे मालकीचे ब्लॉक भाडेकरूने परवानगी न घेता असंविधानीक रित्या परिपक्व बांधकाम तोडून वाढीव बांधकाम केले असून त्याची चौकशी करून त्या भाडेकरुवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी योगेश मडावी यांनी सोमवारी माथार्जुन ग्रामपंचायतचे सचिव मनोज दासरवार यांचे मार्फत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना केली आहे. 

माथार्जुन ग्रामपंचायतने १२ वर्षापूर्वी हे ब्लॉक भाडेतत्त्वावर दिले. ग्रामपंचायतने दिलेल्या भाडे करारानुसार फक्त ११ ते १२ महिने ग्रामपंचायत मार्फत दिले जाते त्यापेक्षा जास्त भाडे करारनामा करण्यास जिल्हा परिषद यवतमाळ यांची अनुमती घ्यावी लागते. ग्रामपंचायतचे व मडावी यांचे माहिती नुसार मागील १२ वर्षापासून भाडे कर (भाड्याची रक्कम) सुध्दा भाडेकरूने ग्रामपंचायत मध्ये जमा केले नाही. परंतू भाडेकरूने परिपक्व बांधकाम तोडून वाढीव बांधकाम केले असून प्रशासनाचे व ग्रामपंचायतचे याकडे दुर्लक्ष आहे. संबंधित भाडेकरू कडून परिपक्क ब्लॉक बांधकाम तोडून ब्लॉक वाढविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाची व वरिष्ठ कार्यालय विभागाची अनुमती घेतली असल्यास अनुमती पत्र व वाढीव बांधकामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता व माथार्जुन ग्रामपंचायतचा ठराव अनुमती पारित केलेला ठराव साक्षांकित करून देण्यात यावे व हे सर्व दस्ताऐवज नसल्यास भाडेकरूने केलेल्या बांधकामाची चौकशी करून भाडेकरूवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश मडावी यांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतचे सचिव मनोज दासरवार यांचे कडे करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतचे ब्लॉक तोडून वाढीव बांधकाम करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा - योगेश मडावी यांची मागणी ग्रामपंचायतचे ब्लॉक तोडून वाढीव बांधकाम करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा - योगेश मडावी यांची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on March 21, 2022 Rating: 5
Powered by Blogger.