उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर
सावली : यावर्षीच्या खरीप हंगाम २१-२२ मध्ये राज्य शासनाने खरेदी केलेल्या धानाला राज्य सरकारने अजूनर्यंत बोनस जाहीर केलेला नाही त्यामुळे चंद्रपूर-गडचिरोली, भंडारा व गोंदिया या धान पट्ट्याच्या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटा चा सामना करावा लागत आहे.
आपल्या हक्काच्या प्रतिक्षे मुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. शेतकऱ्यांमध्ये हक्काच्या बोनस जाहीर करण्यात यावा याकरिता भारतीय जनता पार्टी तालुका सावलीच्या वतीने धरणे देत मुख्यमंत्री यांना नायब तहसीलदार सागर कांबळे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अविनाश पाल,भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, जिप सदस्य संतोष तंगडपल्लीवार, जिल्हा भाजपा महिला उपाध्यक्ष तथा नगरसेविका निलिमा सुरमवार, नगरसेविका शारदा गुरुनुले, पंचायत समिती सदस्य तुकाराम ठिकरे, पंचायत समिती सदस्य गणपत कोठारे, पंचायत समिती सदस्य छाया शेंडे,भाजपा युवा तालुका अध्यक्ष विनोद धोटे, भाजप शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, महिला अध्यक्ष गुड्डी सहारे, जेष्ठ नेते प्रकाश खजांची, कवेंद्र रोहनकर, दिवाकर गेडाम, नामदेव भोयर, राकेश गोलेपल्लीवार, युवा नेता प्रसाद जक्कुलवार,मयूर गुरुनुले, शुभम कटारे,वृषभ कोटरंगे, अंबादास गुरुनुले, अंकुश भोपये, मुक्तेश्वर थोराक, मनोज अमरोजवार आदी कार्यकर्ते सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
धान उत्पादक शेतकऱ्यांना धाणाचा बोनस जाहिर करा...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 25, 2022
Rating:
