ॲड रोहिणी पटवारी यांची नांदेड जिल्हा न्यायाधीश पदी निवड


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : उदगीर तालुक्यातील तोंडार येथील रहिवासी असलेल्या ॲड रोहिणी राजेंद्र पटवारी यांची नांदेड जिल्हा न्यायाधीश पदी निवड झाली आहे.

माननीय उच्च खंडपीठ व एम पी एस सी च्या वतीने सात जागांसाठी जिल्हा न्यायाधीश याच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यात त्यांनी उज्वल यश संपादन केल्यामुळे त्यांची न्यायाधीश पदी निवड झाली आहे.

ॲड रोहिणी राजेंद्र पटवारी या बी ए एल एल एल एल एम बी असून लातूर येथे जिल्हा न्यायालयात दहा वर्ष वकिली व्यवसाय केलेला आहे. त्या दयानंद लॉ कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्य केलेले आहेत तसेच त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या वकील म्हणून कार्य केलेले आहे.

 त्या लातूर जिल्ह्यातील पहिल्या एकमेव महिला न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे त्या ऍडव्होकेट राजेंद्र पटवारी यांच्या त्या सुविज्ञ पत्नी आहेत त्यांच्या या निवडीबद्दल टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघ उदगीर व सावित्रीबाई फुले महिला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका महानंदा सुवर्णकार, बालाजी सुवर्णकार, सुधाकर बापकेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
ॲड रोहिणी पटवारी यांची नांदेड जिल्हा न्यायाधीश पदी निवड ॲड रोहिणी पटवारी यांची नांदेड जिल्हा न्यायाधीश पदी निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on March 25, 2022 Rating: 5
Powered by Blogger.