दुकान गाळ्याचे वाढीव भाडे कर रद्द करा - प्रमोद उरकुडे

रुस्तम शेख | सह्याद्री चौफेर 

कळंब : दुकान गाळेचे वाढीव भाडे कर रद्द करावे , कोरोना च्या काळातील दुकान, (गाळे) भाडे कर माफ करावे तसेच दुकान भाडे कर भरण्यास काही महिन्या करिता सवलत द्यावी इत्यादी मागणीच्या संदर्भात व्यापारी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी नगर पंचायत कळंब यांना निवेदन सादर करण्यात आले.

कोरोना प्रतिबंधक उपायोजना (लॉक डाऊन) काळात सर्व व्यापार, प्रतिष्ठान बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत दुर्बल होऊन व्यवसाय डबघाईत आला आहे.

त्यामुळे वरील मागणीच्या संदर्भात व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद उरकुडे यांनी व्यापारी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी नगर पंचायत कळंब यांच्याशी चर्चा करून वरील मागणीच्या संदर्भात तातडीने योग्य निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी मागणी या प्रसंगी केली .

या पूर्वी नगर पंचायत कळंब यांना निवेदन दिले होते, 
परंतु निवेदनातील विषयाच्या संदर्भात गांभीर्याने दखल घेण्यात आली नसून त्या बाबत अजून पर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्राप्त झाला नाही.

मात्र दुकान गाळे भाडे कर ची वसुली सक्तीने करण्यात येत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात असंतोष पसरलेला आहे.

सदर मागणीच्या संदर्भात गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक भूमिका घेतली गेली नाही ,तर जन आंदोलन करण्यात येईल त्या वेळी संवेदनशील परिस्थिती निर्माण झाल्यास याला नगर पंचायत प्रशासन जबाबदार राहील असा तीव्र इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. .

निवेदन देते वेळी मुस्ताक शेख, शैलेश नक्षणे, दीपक कुटेमाटे, राफे खतीब, संजय कुबडे, आदि गुल्हाने, प्रशांत कडूकर, सुशील खिरटकर, प्रवीण चांदोरे, यशवंत एकूणकार, किसन निलजकर, साहिल शिरभाते जानराव पोटे, रुस्तम शेख (प्रतिनिधी), अनुप साळवे (पत्रकार) इत्यादी बहुसंख्या व्यापारी उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच पदाधिकारी (लोकप्रतिनिधी) यानी व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आमचे प्रतिनिधी रूस्तम शेख यांच्या कडे व्यापारी बांधवांनी व्यक्त केली आहे.
दुकान गाळ्याचे वाढीव भाडे कर रद्द करा - प्रमोद उरकुडे दुकान गाळ्याचे वाढीव भाडे कर रद्द करा - प्रमोद उरकुडे Reviewed by सह्याद्री चौफेर on March 30, 2022 Rating: 5
Powered by Blogger.