कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : एकशे पन्नास दिवस होत आहे तरी संपा सुरूच आहे. त्यामुळे संपात सहभागी का होत नाही, या कारणावरून एका चालकाला शिवागीळ करत लाथा बुक्क्यानी मारहाण केल्याची घटना येथील बस स्थानकासमोर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
भाऊराव चरणदास पेंदोर असे तक्रारकर्त्या चालकाचे नाव आहे तर, बंडू खडसे व विष्णू चिलईकर अशी आरोपिंची नावे आहेत. यातील विष्णू चिलईकर हा वांजरी येथील रहिवाशी असून तो चिमूर बस आगारात चालक म्हणून कार्यरत आहे. बंडू खडसे हा भाऊराव पेंदोर यांना संपात सहभागी का होत नाही, तुझ्यामुळे आम्हाला ड्युटीवर घेत नाहीये, असे म्हणून बंडू व विष्णू यांनी भाऊराव ला शिवागीळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.
याबाबत तक्रार करण्यासाठी गेले असता, आगार प्रमुखांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप पेंदोर यांनी केला.
संपात सहभागी का होत नाही म्हणून बस चालकाला मारहाण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 30, 2022
Rating:
