अनु. जमातीचे यादीत ईतर कोणतीही जात समाविष्ट करु नये


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत धनगर समाजाला अनु. जमातीचे यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली. सदर मागणी ही अयोग्य असून धनगर समाजात आदिवासीचे संस्कृती, बोलिभाषा, पेहराव, व देवदेवता यांचे कुठेही संबंध जुळून येत नाही धनगर हे आदिवासी नाहीत म्हणून धनगर समाजाला अनु. जमातीचे यादीत समाविष्ट करण्यात येऊ नये.

आधीच आदिवासी समाज अशिक्षित असून आर्थिक व शेक्षणिक दृष्टया कमकुवत आहे. त्यात प्रत्येक क्षेत्रात बोगस आदिवासी बनावट जातींचे दाखले तयार करून खऱ्या आदिवासीचे जागेवर नोकरीला लागलेले आहेत खरे आदिवासी आज देखील लाखोंचे संख्येने बेरोजगारीने वन वन फिरत आहेत. अनेक वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयात बोगस आदिवासी विध्यार्थी आदिवासीचे जागेवर प्रवेश घेऊन डॉक्टर, इंजिनिअर झालेले आहेत. आणि आज देखील होत आहेत. आदिवासीचे विद्यार्थी मात्र आपल्या हक्का पासून वंचित आहेत. त्यात आणखी ईतर जमातींचा जर समावेश केला तर ते आदिवासी जनतेवर अन्याय होईल म्हणून या पुढे आदिवासीचे यादी मध्ये ईतर जातींचा समावेश करण्यात येऊ नये.या आशयाचे निवेदन नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन यवतमाळ यांचे वतीने भारताचे मा.प्रधानमंत्री  यांना जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी आदिवासी पीपल्स फेडरेशन चे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सिडाम, सचिव लक्ष्मण कुळसंगे,उपाध्यक्ष गुलाबराव मसराम,एम्प्लॉईज फेडरेशन चे केंद्रीय सदस्य पवनकुमार आतराम, राज्यउपाध्यक्ष गुलाबराव कुडमेथे, महासचिव किशोर उईके,ट्रायबल टायगर फोर्स चे विकास कुळमेथे, जि. प. कर्मचारी पतसंस्थेचे संचालक शंकर कोटनाके, बाबाराव कुळसंगे,नरेश उईके, रामभाऊ तोडासे, गणेश धुर्वे, प्रकाश उईके,शहर अध्यक्ष संजय मडावी,अविनाश कुळमेथे,माणिक मडावी इत्यादि सभासद उपस्थित होते.
अनु. जमातीचे यादीत ईतर कोणतीही जात समाविष्ट करु नये अनु. जमातीचे यादीत ईतर कोणतीही जात समाविष्ट करु नये Reviewed by सह्याद्री चौफेर on March 30, 2022 Rating: 5
Powered by Blogger.