बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
उदगीर : येथील श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयातील सहशिक्षक श्री बालाजी सुवर्णकार यांना चला कवितेच्या बना अंतर्गत वाचक संवाद २६१ मध्ये मध्ये त्यांनी सन १९८८ पासून आजतागायत उदगीर शहरात शैक्षणिक सामाजिक धार्मिक इत्यादी कार्यात सहभागी होऊन उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना व मर्यादित ज्ञान मर्यादित वेळेत प्राप्तीसाठी चालू असलेल्या जागतिक कीर्तिच्या वाचक संवादात नोंदवत असलेली त्यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण असून वाचन संस्कारा संदर्भात देत असलेले योगदान ना बद्दल वाचक मित्र पुरस्कार प्राध्यापक संधी कर व सेवानिवृत्त शिक्षक तथा योगाचार्य शिवमूर्ती भातांब्रेकर सर व आनंद कदम यांच्या उपस्थितीत वाचक मित्र पुरस्कार २०२२ देण्यात आला.
सुवर्णकार बालाजी यांना हा वाचक मित्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल दैवज्ञ सोनार संघाचे राज्याध्यक्ष दिलीप महत्कर अमरावती व दैवज्ञ सोनार युवक मंडळ सेवाभावी संस्था नांदेड चे राजू आंबेकर, दैवज्ञ सोनार एकता संघ पुणे चे पदाधिकारी मधुकर टोंपे, नामदेव सुवर्णकार व संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघाचे उदगीर चे अध्यक्ष सचिन पोद्दार उपाध्यक्ष विजय पेनुरकर, कोषाध्यक्ष राजेंद्र रत्नपारखी, सहसचिव एकनाथ रत्नपारखी व दैवज्ञ सोनार युवक मंडळाचे अध्यक्ष अच्युत पंडित, उपाध्यक्ष भागवत पोद्दार व इतर सर्व पदाधिकारी तसेच बारा बलुतेदार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर दापकेक, परभणीचे प्राध्यापक अतुल काटकर यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले असून बालाजी सुवर्णकार यांचे वाचक शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बालाजी सुवर्णकार वाचक मित्र शिक्षक पुरस्काराने सन्मानित
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 23, 2022
Rating:
