सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव : तालुक्यात काही रेती घाटाचा लिलाव झाला नसल्यामुळे रेती तस्करांनी (वाहन व्दारे) दिवस रात्र अवैध रित्या रेती नेण्याचा सपाटा लावला आहे.
अश्यातच वराेडी मार्गावर उभ्या असणा-या अनिल माराेती अडकीने यांचे वर एका वाहन चालकाने काही कारण नसतांना भरधाव अवैध रेती वाहन नेण्याचा प्रयत्न केला. एव्हढेच नाही तर त्या चालकाने अडकीने यांस जिवानिशी मारण्याची धमकी सुध्दा दिली.या बाबतीत अनिल अाडकीने यांनी महागांव पाेलिस स्टेशनला दि.२६फेब्रुवारीला रितसर तक्रार दाखल केली आहे. वराेडी येथील रेती घाटाचा अद्याप लिलाव झाला नसुन रेती तस्कर सर्रासपणे दिवसाढवळ्या या ठिकाणाहुन रेती नेत असल्याची जनतेत आेरड आहे.यास गांव पातळीवरील तलाठ्याचा रेती तस्करांना आशीर्वाद असल्याचे खुलेआम बाेलल्या जाते.
महागाव पाेलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचा-यांनी या घटनेतील मुजाेर व हेकेखाेर वाहन चालकावर गुन्हा दाखल करुन त्याचेवर याेग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी अनिल अडकीने यांनी केली आहे .तदवतचं महागांव महसुल प्रशासनाने अश्या रेती तस्करांच्या मुसक्या आवळून त्यांना वेळीच याेग्य धडा शिकवावा अशी वराेडी ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे.
रेतीचे भरधाव ट्रॅक्टर अंगावर चालविण्याचा प्रयत्न , पाेलिस स्टेशनला रिपोर्ट दाखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 02, 2022
Rating:
