समाजात महिला नेतृत्वास डावलले जाते - कुसुम ताई अलाम


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : स्वतंत्र महिला नेतृत्व सक्षम असले तरी ते स्विकारले जात नाही. ज्यांना राजकीय पाठबळ नाही अशा अभ्यासू, विचारवंत व निर्णयक्षमता असलेल्या महिलांना संधी डावलली जाते. National Council of Women Leader's या दिनांक 5 व 6 मार्च रोजी पुणे येथे दोन दिवसीय कार्यक्रमात आदिवासी महिला विषयक व पंचायत राज मधील महिला विषयक चर्चा सत्रात जिल्हा परिषद सदस्य कार्यकाळातील अनुभवाची उकल करीत माजी जि.प.सदस्या, गडचिराेलीच्या सामाजिक कार्यकर्त्या तथा महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या जेष्ठ मार्गदर्शिका कुसुमताई अलाम या वेळी बोलत होत्या.

दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक महिला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य विषयक, मानसिक सक्षमपणे उभ्या राहिल्या पाहिजेत यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय यावर चर्चा केल्या गेली. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भक्कमपणे मजबूत व्हावे. शासकिय स्तरावरून विविध प्रकारच्या योजना मिळाव्या त्यासाठी पाठपुरावा करणे, डाटा, पुरावे, दस्ताऐवजीकरण करणे, कायदेविषयक पॅनल तयार करणे, इत्यादी विषयांवर नियोजनबध्द कार्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे चर्चेतून या वेळी सुर उमटले
कार्यक्रमास डॉ .शितल कांबळे यांचेसह महाराष्ट्रातील अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
समाजात महिला नेतृत्वास डावलले जाते - कुसुम ताई अलाम समाजात महिला नेतृत्वास डावलले जाते - कुसुम ताई अलाम Reviewed by सह्याद्री चौफेर on March 08, 2022 Rating: 5
Powered by Blogger.