लक्कडकोट येथे शाळापूर्व तयारी अभियान प्रशिक्षण


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 
                
राजुरा : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबूपेठ , चंद्रपूर स्टार्स प्रकल्प अंतर्गत शाळा पूर्व तयारी अभियान केंद्रस्तर प्रशिक्षण पंचायत समिती राजुरा अंतर्गत जि प उ प्राथ शाळा लक्कडकोट, येथे केंद्र देवाडाचे प्रशिक्षण श्री शेषराव वानखेडे, केंद्रप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले. 
       
प्रशिक्षणाची सुरवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मा सौ कल्पना श्रीकुंडावार व श्री राजकर शेडमाके सर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार व दीप प्रज्वलित करून करण्यात आले. सदर प्रशिक्षणात शाळापूर्व तयारी कशी करावी शाळापूर्व तयारी कशासाठी, नवीन शैक्षणिक धोरण यामध्येपालकांची भूमिका, शिक्षक, अंगणवाडी सेविका, गावातील शिक्षण प्रेमी यांची भूमिका समजावून या सर्वांच्या मदतीने दाखलपात्र विद्यार्थी यांची शाळा पूर्व तयारी कशी करावी या बाबत सखोल माहीती मार्गदर्शक श्री दिलीप पाटील सर यांनी दिली.
               
तसेच शाळा पूर्व तयारी अभियानाच्या यशस्वीकरिता मेळावा कसा घ्यावा, मेळाव्यामध्ये ७ स्टॉल कसे लावावे, प्रत्येक स्टॉलवर कोणकोणत्या कृती घ्याव्या, कृती कार्ड कसे वापरावे व पालकांच्या मदतीने १० ते १२ आठवडे बालकांचा अभ्यास कसा घ्यावा याबाबाबत श्री प्रकाश रोकमवार सर व श्री देवेंद्र रहांगडले विषयतज्ञ गट साधन केंद्र राजुरा यांनी माहिती देऊन प्रत्यक्ष पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
             
सदर प्रशिक्षणाला देवाडा केंद्रातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक, १ ते ५ विला शिकविणारे सर्व शिक्षक व जिल्हा परिषद शाळा क्षेत्रातील सर्व अंगणवाडी शिक्षिका असे एकूण ५५ प्रशिक्षणार्थी यांनी उपस्थिती दर्शविली.

यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी यांना स्वादिष्ट अल्पोआहार, चाय व थंड पाण्याची उत्तम सोय करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शेषराव वानखेडे केंद्रप्रमुख देवाडा यांनी तर संचालन श्री संतोष उईके सर व आभार प्रदर्शन श्री मधुकर गोरे सर यांनी केले.
लक्कडकोट येथे शाळापूर्व तयारी अभियान प्रशिक्षण लक्कडकोट येथे शाळापूर्व तयारी अभियान प्रशिक्षण Reviewed by सह्याद्री चौफेर on March 29, 2022 Rating: 5
Powered by Blogger.