शौचास गेलेल्या मुलीवर दिवसाढवळ्या अत्याचार, घटनेने उडाली एकच खळबळ

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : महिला व मुलींवरील अत्याचारांच्या घटना प्रचंड वाढल्या असून दिवसागणिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील कुंभा येथील एका अल्पवयीन मुलीवर वासनेने पिसाटलेल्या एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतात शौचास गेलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर वासनांध युवकाने झडप घातली, व तिला आपल्या वासनेचा शिकार केले. वासनेने पिसाळलेले हे नराधम महिला व मुलींच्या आब्रूचे लचके तोडू लागले आहेत. दिवसा ढवळ्या मुलींवर अत्याचार करण्याइतपत या नराधमांची मजल वाढली आहे. माणसात जनावरी प्रवृत्ती वाढू लागल्याने मुलींचे एकटे घरून बाहेर पडणे धोकादायक झाले आहे. या नराधमांना कायद्याची भीती न उरल्याने ते चांगलेच निर्ढावले आहेत. शौचास गेलेल्या मुलीचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या पोलिसांनी काही तासांतच मुसक्या आवळल्या असल्या तरी मुलींच्या आब्रूवर हात घालण्याचे धाडस करणाऱ्या या विकृतांना कायद्याचा धडा शिकविण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी अतिजलद तपास करून शहाबाज शेख शब्बीर (२७) रा. माता नगर राळेगाव या नराधमाला व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली आहे. 
कुंभा येथील अल्पवयीन मुलगी जवळच असलेल्या शेतशिवारात शौचास गेली होती. दरम्यान त्याच मार्गाने प्रवास करणाऱ्या एका विकृताची नजर त्या मुलीवर पडली. मुलगी एकटीच शौचास जात असल्याचे पाहून त्याच्यातली वासना जागी झाली. त्याने तिचा पाठलाग करून तिला आपल्या वासनेचा शिकार बनविले. आरोपी सोबत असलेला विधिसंघर्षग्रस्त बालक रस्त्याची निगराणी करत होता. मुलीवर अत्याचार केल्यानंतर दोघांनीही दुचाकीने पळ काढला. अचानक घडलेल्या घटनेने मुलगी चांगलीच हादरली. तिने घरी येऊन वडिलांसमोर आपबिती कथन केली. या घटनेने तिचे कुटुंबही पुरते हादरले. परिसरातही या घटनेने खळबळ उडाली. वडिलांनी मुलीला घेऊन सरळ पोलिस स्टेशन गाठले, व पोलिसांना घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जलद तपास केला, व राळेगावच्या दिशेने पाळलेल्या आरोपींना राळेगावातून तत्काळ अटक केली. आरोपी शहाबाज शेख शब्बीर याच्या विरुद्ध पोलिसांनी भादंवि च्या कलम ३७६, ३७६(२)(J) व सहकलम ४,६,८ बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करित आहे.
शौचास गेलेल्या मुलीवर दिवसाढवळ्या अत्याचार, घटनेने उडाली एकच खळबळ शौचास गेलेल्या मुलीवर दिवसाढवळ्या अत्याचार, घटनेने उडाली एकच खळबळ Reviewed by सह्याद्री चौफेर on March 21, 2022 Rating: 5
Powered by Blogger.