कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : कोरोना नंतर शाळेत येणाऱ्या दाखलपात्र विद्यार्थी हे पूर्णतः गोंधळलेल्या अवस्थेत राहणार आहे. अंगणवाडी किंवा शाळा न पाहलेल्या विद्यार्थ्यांना शाळेची ओळख व्हावी तसेच शिक्षक व पालकांना त्यांच्या बौद्धिक कौशल्याची जाणीव व्हावी यासाठी शाळेशाळेत मेळाव्याचे आयोजन करून दाखलपात्र विद्यार्थ्यांची शाळा पूर्वतयारी करून घेतली जाणार आहे. पुढील सत्रात नव्याने दाखल होण्याऱ्या विद्यार्थ्यांची शाळा पूर्वतयारी करून घेता यावी यासाठी शिक्षण विभागाने नियोजन आखले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ व पंचायत समिती मारेगाव च्या संयुक्त विद्यमाने शाळा पूर्वतयारी अभियान तालुकास्तरीय प्रशिक्षण येत्या २३ व २४ मार्च २०२२ रोजी नरसाळा येथील जिल्हा परिषद शाळा मध्ये प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर सर्व शालास्तरावर शाळा पूर्वतयारीचे विद्यार्थिकेंद्रित मेळावे आयोजित करण्यात येणार असून, त्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता पातळी लक्षात घेऊन त्यांच्या पालकांच्या मदतीने त्यांना अपेक्षित गुणवत्ता पातळीपर्यंत पोचवीण्याचे उदिष्ट निश्चित केल्या जाणार आहे. यासाठीचे केंद्रस्तरावर अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक या सर्वांना प्रशिक्षित केल्या जाणार आहे. या मेळाव्याला पालकांचे समुपदेशनसह विद्यार्थ्यांचे भाषा, गणित, शारीरिक व बौद्धिक गुणवत्ताचा अंदाज घेतल्या जाणार आहे.
शाळेत दाखलपात्र विद्यार्थ्यांची होणार शाळा पूर्वतयारी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 21, 2022
Rating:
