सह्याद्री न्यूज | रवि घुमे
मारेगाव : आज दि. १५ फेब्रुवरी २०२२ रोजी मंगळवार ला वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांची २८३ वी जयंती श्री जगन्नाथ महाराज सेवाश्रम वणी येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला जवळपास शेकडो बंजारा समाजबांधव उपस्थित होते.
सर्वप्रथम भोगविधी, ध्वजपूजन व संत सेवालाल महाराज यांचे प्रतिमेचे पूजन समाजातील जेष्ठ व्यक्ती व नायक श्री जयंत चव्हाण यांनी केले तर श्री. के. टी. भाऊ, प्रा. श्री. एन. आर. पवार, प्रा. व्ही. एन. चव्हाण या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील जाधव यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. बाळुभाऊ चव्हाण, प्रा. गजानन राठोड व मथुरा भाऊ चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले. समाजातील महिलांनी नृत्य करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. सहभोजनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
जगदगुरु संत सेवालाल जयंती उत्सहात साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 15, 2022
Rating:
