सावली नगर पंचायत च्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीकडून सौ. लता महादेव लाकडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली- जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. विजय भाऊ वडेट्टीवार यांचा बालेकिल्ला असलेल्या सावली नगर पंचायती वर एकहाती सत्ता काबीज करत पुन्हा एकदा सावली वासीयांनी विकासाला मत देत १७ पैकी १४ उमेदवारांना निवडून दिले. आता नगराध्यक्ष पदासाठी सौ. लताताई महादेव लाकडे यांची बिनविरोध निवड होऊन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. श्री. विजय भाऊ वडेट्टीवार यांनी सावली च्या विकासाला कधीच काही कमी पडू दिले नाही. यावर सावली जनतेनी विश्वास ठेवत काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री संदीप पाटील गड्डमवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा काँग्रेस ला एकहाती सत्ता दिली.
                
 यावेळी उपस्थित काँग्रेसचे गटनेते श्री संदीप पुण्यापकर, जेष्ठ नेते श्री प्रशांत राइंचवार, श्री सचिन संगीडवार नगरसेवक, श्री प्रीतम गेडाम नगरसेवक, श्री अंतबोध बोरकर नगरसेवक, श्री भोगेश्वर मोहूर्ले माजी उपनगराध्यक्ष, सौ. मनीषा वजाळे मुख्याधिकारी नगर पंचायत, श्री खेडकर उपविभागीय अधिकारी, श्री मोतीलाल दुधे कार्यालय प्रमुख, श्री मोहन गाडेवार, श्री नितीन गड्डमवार, श्री हसमुख दुधे, श्री राजू राऊत, श्री स्नेहदीप वाळके, शी स्वप्नील संतोषवार, श्री मृणाल गोलकोंडावार, श्री प्रशांत नारनवरे, श्री आकाश खोब्रागडे, श्री निखिल रामटेके, श्री सुनील ढोले, सौ अंजली दमके, सौ मंगला गेडाम, सौ कविता मुत्यालवार व संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
सावली नगर पंचायत च्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीकडून सौ. लता महादेव लाकडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल सावली नगर पंचायत च्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीकडून सौ. लता महादेव लाकडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल Reviewed by सह्याद्री चौफेर on February 11, 2022 Rating: 5
Powered by Blogger.