सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राेहन घुगे तसेच येथील तहसीलदार निलेश गाैंड यांचे मार्गदर्शनखाली चंद्रपूर तालुक्यात नायब तहसीलदार सचिन खंडाते, राजू धांडे, जितेन्द्र गादेवार आणि महसुल विभागातील चंद्रपूर नगरीचे मंडळ अधिकारी रमेश आवारी, पडाेली विभागाचे मंडळ अधिकारी विनाेद गनफाडे, घुग्गुस क्षेत्राचे मंडळ अधिकारी किशाेर नवले आणि महसुल फिरत्या पथकात समावेश असणारे पटवारी व कर्मचारी यांनी माहे डिसेंबर महिण्यांत तब्बल ३३ तर जानेवारी महिण्याच्या आरंभीच ९ अवैध गाैण खनिज उत्खनन व वाहतुक प्रकरणात दंडात्मक धडक कारवायां केल्याचे वृत्त आहे.
विशेष उल्लेखनिय बाब अशी की काल सकाळी चंद्रपूरच्या एका मार्गावर याच महसुल पथकाने एका अवैध गाैण खनिज वाहनास दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे तर शहरातील अन्य एका ठिकाणी पडाेलीचे मंडळ अधिकारी विनाेद गनफाडे यांनी दाेन दिवसापुर्वी अमाेल वाघ यांचे अवैध रेती वाहनास चंद्रपूर तहसील कार्यालयात जमा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान या महसुल पथकांच्या सततच्या कारवायांमुळे अवैध रेती विक्रीचा व्यवसाय करणां-या रेती तस्करांत एकच खळबळ उडाल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येते.
तालुक्यातील कार्यरत महिला पटवारी पाेर्णिमा बदखल, प्रिती बाेरसरे, रजनी मडावी व अन्य दाेन महिला तलाठ्यांनी जिव धाेक्यात घालून अवैध रेती तस्करांच्या वाहनांवर धडक कारवायां केल्याचे ही बाेलल्या जाते. तालुक्यात सध्या स्थितीत चंद्रपूर विभागाच्या महसुल पथकांचे काम समाधानकारक असून या धडक कारवायांमुळे दंडापाेटी शासनाच्या तिजाेरीत बरीच माेठी रक्कम जमा झालेली आहे.
जिल्ह्यात गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूरचे एसडीआे राेहन घुगे, मुलचे तहसीलदार डॉ.रवीन्द्र हाेळी, काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे तर चंद्रपूर खनिकर्म विभागातील अल्का खेडकर यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता माेठ्या प्रमाणात अवैध गाैण खनिज प्रकरणात कारवायां केल्या आहे. रेती तस्करांत आज ही या अधिका-यांचा धाक कायम अाहे.
अश्या नित्य कारवायां झाल्यास निश्तितचं अवैध गाैण खनिजांवर आळा बसेल असे येथील जनतेत बाेलल्या जात आहे.
३४ दिवसांत ४२ अवैध गाैण खनिज वाहनांवर चंद्रपूर महसूल पथकांच्या कारवायां !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 03, 2022
Rating:
