छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती झेंडे व बॅनर लावणाऱ्यावर कार्यवाही करावी, युवासेनेचे अजिंक्य शेंडे यांच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
  
वणी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या भोवती असलेल्या आवाराला राजकीय पक्षांचे झेंडे व जाहिरातींचे बॅनर लावले जात असुन पुतळ्याचे आवार पक्षांचे झेंडे व जाहिरातीचे बॅनर लावण्याचे ठिकाण बनले असल्याची तक्रार करतांनाच याठिकाणी झेंडे व बॅनर लाऊ न देण्याची मागणी करित पुतळयाच्या सौंदर्यीकारनाचे विद्रूपीकरण करणारयांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे निवेदन युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले. त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन शहर प्रशासनाने पुतळ्या भोवताल लावलेले पक्षांचे झेंडे व बॅनर काढून पुतळयाचे आवार पक्षांच्या जाहिरातबाजी पासुन मुक्त केले. पुतळ्याच्या आवरावर विविध पक्षांचे झेंडे व जाहिरातीचे बॅनर लावण्यामुळे आतील सौंदर्यीकरण व पुतळाही झाकल्या जात होता. शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती असलेलं आवार हे झेंडे व जाहिराती लावण्यासाठी नसून पुतळ्याच्या संरक्षणासाठी असल्याचे सांगत महाराजांच्या पुतळ्या भोवती असलेल्या आवारावर पक्षांचे झेंडे व जाहिरातींचे बॅनर लावण्यारयांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी अजिंक्य शेंडे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा शहरात उभारून पुतळ्याचे आकर्षक सौंदर्यीकरण करण्यात आले. पुतळ्याजवळ बसविण्यात आलेले पाण्याचे कारंजे नागरिकांना आकर्षित करत असून नागरिक या पुतळा परिसरात तासंतास रमतात. पुतळ्या भोवती संरक्षण आवार बांधण्यात आले असून या आवारावर विविध पक्षांचे झेंडे व जाहिरातींचे बॅनर लावले जातात. त्यामुळे पुतळा झाकल्या जात असून पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण केल्या जात आहे. पुतळ्या भोवतालचं आवार पक्षांचे झेंडे व जाहिरातींचे बॅनर लावण्याचं ठिकाणच बनलं आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती झेंडे व जाहिरातींचे बॅनर लावण्यावर निर्बंध लावून पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी केली होती. याबाबत उपविभागीय अधिकारी, न.प. मुख्याधिकारी व ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले होते. त्यांच्या निवेदनाची दखल घेत शहर प्रशासनाने शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती लावलेले झेंडे व जाहिरातींचे बनर काढून पुतळ्याचा आवार पक्षांच्या जाहीरातबाजी पासुन मुक्त केला.

निवेदन देतांना युवासेनेचे गुंजन भोंगळे, उमेश चिडे, मिलिंद बावणे, गुड्डू घाटोळे, शिवराम चिळे, गौरव देशमुख चेतन उलमाले, पवन फाये, हितेश गोडे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती झेंडे व बॅनर लावणाऱ्यावर कार्यवाही करावी, युवासेनेचे अजिंक्य शेंडे यांच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती झेंडे व बॅनर लावणाऱ्यावर कार्यवाही करावी, युवासेनेचे अजिंक्य शेंडे यांच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल  Reviewed by सह्याद्री चौफेर on February 03, 2022 Rating: 5
Powered by Blogger.