मुलीला घरी घेऊन आलेल्या बापावर भाच्याने चढविला हल्ला, लोखंडी वस्तूने प्रहार करून मामाला केले जखमी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : आत्याच्या घरी थांबलेल्या मुलीला वडिलांनी जबरदस्ती घरी का नेले या कारणावरून भाच्याने मामाशी वाद घालून मामाच्या डोक्यावर लोखंडी वस्तू मारून जखमी केल्याची घटना काल २ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील रांगणा या गावात घडली. याबाबत मामाने भाच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी मामाला जखमी करणाऱ्या भाच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

रांगणा येथे राहणाऱ्या राजू बळीराम लोढे (४४) यांची अल्पवयीन मुलगी नांदेपेरा येथे आपल्या आत्याच्या घरी थांबली. मुलगी बराच वेळ घरी न आल्याने वडिलांनी तिची चौकशी करत मुलीच्या आत्याचे घर गाठले. मुलगी आत्याकडे आढळून आल्याने वडिल तिला घरी घेऊन आले. मुलीला जबरदस्ती घरी की नेले म्हणून मंगेश भास्कर चिकटे (२१) रा. नांदेपेरा मुलीच्या घरी आला, व नात्याने मामा लागत असलेल्या मुलीच्या वडिलांशी वाद घालत त्याने लोखंडी वस्तूने मामावर प्रहार केला. यात मामाच्या डोक्यावर व डोळ्याच्या खाली लोखंडाचा मार बसल्याने मामाला चांगलीच दुखापत झाली. याबाबत राजू लोढे यांनी मंगेश चिकटे या आपल्या भाच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला मारहाणीची तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी मंगेश चिकटे विरुद्ध भादंवि च्या कलम ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एएसआय प्रभाकर कांबळे करित आहे.
मुलीला घरी घेऊन आलेल्या बापावर भाच्याने चढविला हल्ला, लोखंडी वस्तूने प्रहार करून मामाला केले जखमी मुलीला घरी घेऊन आलेल्या बापावर भाच्याने चढविला हल्ला, लोखंडी वस्तूने प्रहार करून मामाला केले जखमी Reviewed by सह्याद्री चौफेर on February 03, 2022 Rating: 5
Powered by Blogger.