दुचाकीला बोलेरोने दिली धडक, दुचाकीस्वार ठार

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्यातील खैरगाव (भेदी) येथून बोटोणी कडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून येत असलेल्या बोलेरो वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज (ता.४ फेब्रु.) शुक्रवारला दुपारी २:०० च्या दरम्यान घडली.

परसराम नागो टेकाम (३२) रा.ढोकी ता.केळापूर असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते दुचाकीने खैरगाव मार्गे बोटोणीकडे जात असतांना समोरून येणाऱ्या बोलेरो या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात परसराम गंभीर जखमी झाला. त्यास मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले असे वृत्त आहे.
पुढील तपास सुरू आहे.