टॉप बातम्या

धक्कादायक : पांढरकवडा येथील युवकाने पेट्रोलने घेतले जाळून

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : तालुक्यातील पांढरकवडा (पिसगांव) येथील २९ वर्षीय युवकाने स्वतःला पेट्रोल ने जाळून घेत आत्महत्या केली असल्याची घटना घडली.

पांढरकवडा (पिसगांव) येथील रहिवासी संतोष उर्फ संदीप अरविंद आस्वले असे पेट्रोलने स्वतः ला जाळून घेतलेल्या युवकाचे नाव आहे. संदीप ने आपल्या राहत्या घरी अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्महत्या केली असल्याची घटना आज शुक्रवारला दुपारी ४ वाजताच्या दरम्यान, उघडकीस आली. यात तो जवळपास ८० टक्के जळाला व त्याचा करून अंत झाला.

आत्महत्या चे कारण अस्पष्ट असून त्याच्या पाठीमागे आई वडील व एक भाऊ असा आप्त परिवार आहे.
Previous Post Next Post