रेतीचे घाट झाले सुरु, तरीही रेतीची चोरी करू,चोरट्यांनी लढवली शक्कल, महसूल विभागाने ठिकाणावर आणली त्यांची अक्कल !
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
बेलोरा रेती घाटावरून रेती भरून वणीकडे येत असलेल्या ट्रकला (MH २९ BE ०८३१) महसूल विभागाच्या पथकाने वणी घुग्गुस मार्गावरील जन्नत हॉटेल जवळ थांबविले. ट्रक चालकाकडे २ ब्रास रेतीची रॉयल्टी होती. ट्रक मधील रेतीची पाहणी केली असता रेती जास्त असल्याचे महसूल विभागाच्या लक्षात आले. रेतीचे मोजमाप केले असता ट्रकमध्ये ६ ब्रास रेती असल्याचे आढळून आले. तहसीलदारांनी रेतीसह ट्रक ताब्यात घेऊन तहसील कार्यालयासमोर लावला. सदर ट्रक हा सलीमभाई यवतमाळ यांचा असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. त्याच्या कडून ४ ब्रास रेती जास्त भरल्याने ९३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचेही तहसीलदारांनी सांगितले आहे. महसूल विभागाला रेती चोरीच्या या प्रकाराबद्दल माहिती मिळाल्याने तहसीलदारांनी स्वतः महसूल पथकासह वणी घुग्गुस मार्गावर सापळा रचून रेती चोरीचा हा प्रकार उघड केला आहे. रेती चोरांनी चोरी करण्याची अनोखी शक्कल लढविल्याने प्रशासनही विचारात पडले आहे. रेती घाट बंद असतांना रेतीचे अवैध उत्खनन करून शासनाला कोट्यवधींचा चुना लावणारे रेती माफिया आता रॉयल्टीचा आधार घेऊन रेती चोरी करू लागले आहेत. शासनाच्या महसुलावर डल्ला मारून तस्कर गल्ला जमवू लागले आहेत. प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून चोरीचा डाव साधू लागले आहेत. महसूल विभागाने एका ट्रकवर कार्यवाही करून चोरीची ही शक्कल उधळून लावली असली तरी पुष्पारूपी हे तस्कर विविध शक्कली लढवून रेती चोरीच्या प्रयत्नातच राहणार आहेत. रेतीच्या विक्रीतून मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने तस्कर कोणतीही जोखीम पत्करायला तयार होतात. त्यामुळे अनेक धडक कारवाया होऊनही रेती तस्करीवर लगाम लागलेला दिसत नाही. उलट रेती तस्कर आणखीच निर्ढावल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महसूल प्रशासन शासनाचा महसूल चोरट्यांच्या घशात जाण्यापासून वाचवेल की, रेती चोरांचच चांग भलं होत राहील, ही चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.
रेतीचे घाट झाले सुरु, तरीही रेतीची चोरी करू,चोरट्यांनी लढवली शक्कल, महसूल विभागाने ठिकाणावर आणली त्यांची अक्कल !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 03, 2022
Rating:
