राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : नगर सेवा स्वच्छता समिती, I Can करियर अकादमी व उड्डाण करियर अकादमी वणी यांच्या विद्यमाने स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. जिजामाता यांच्या जयंती निमीत्त वणी मुकुटबन मार्गावरील जिजामाता चौक परिसरात स्वच्छता अभियान राबवुन त्यांना अभिवादन करण्यात आले. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वाघदरकर यांनी यावेळी जिजामाता यांच्या आदर्श जिवनावर प्रकाश टाकतांना म्हटले की, स्वराज्याचा ध्यास मनी बाळगून व आपल्या मुलात ते संस्कार रुजवुन छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा देणारया स्वराज्य जननी जिजामाता यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला घडवावे. यावेळी ज्योती खारकर यांनी देखील मां जिजाऊ यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे ऋषिकांत पेचे, भाऊ आसुटकर, मारोती जिवतोडे, अजय धोबे, दत्ता डोहे, अमोल टोंगे, मंगेश खामनकर, नगर सेवा स्वछता समितीचे अध्यक्ष नामदेव शेलवड़े, दिनकर ढवस, राजेंद्र साखरकर, ताई शेलवड़े, I Can करियर अकादमीचे सोपान लाड, उड्डाण करियर अकादमीचे गणेश आसुटकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशी खिरेकर यांनी तर आभार प्रदर्शन महेश लिपटे गुरूजी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर सेवा स्वछता समिती, I Can करियर अकादमी व उड्डाण करियर अकादमी वणी च्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी Reviewed by सह्याद्री चौफेर on January 12, 2022 Rating: 5
Powered by Blogger.