मोठी बातमी : राज्यातील सर्व शाळा पुन्हा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून म्हणजेच 24 जानेवारीपासून सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. 

 तसेच पालकांची समंती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असं संपूर्ण शिक्षण सुरू होणार आहे. असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.शाळांबाबतचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे :कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबी पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत. त्याबाबतचे सर्व निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहेत. असं शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. 

 दरम्यान, राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे आता शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी विविध घटकांतून केली जात होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
मोठी बातमी : राज्यातील सर्व शाळा पुन्हा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती मोठी बातमी : राज्यातील सर्व शाळा पुन्हा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती Reviewed by सह्याद्री चौफेर on January 20, 2022 Rating: 5
Powered by Blogger.