सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे
पुणे : लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या धारावी कट्टा या हिंदी , कन्नड आणि तेलुगू चित्रपटाचा मुहुर्त पुण्यात नुकताच संपन्न झाला. अल्ताफ शेख यांच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या वेडा बी एफ या चित्रपटाने चित्रपटगृहात चांगलाच गल्ला केला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. या चित्रपटानंतर बेतुका हा हिंदी चित्रपट, कम ऑन विष्णू हा कन्नड चित्रपट आणि आता धारावी कट्टा या चौथ्या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या लेखणी वैविध्यपूर्ण आहे. त्यांनी लिहिलेल्या मराठीतल्या पहिल्या कव्वालीची 'वर्ल्ड बुक रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. आता धारावी कट्टा या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, याचे डिजिटल राईट्स प्राईम पिक्चर फाईव्ह या ओटिटी प्लॅटफॉर्मने घेतले असल्याचे माहिती अल्ताफ शेख यांनी दिली आहे. धारावी कट्टाचे लेखक आणि दिग्दर्शक स्वतः अल्ताफ शेख आहेत. या सिनेमाची कथा एका वस्तीमधील चार मुले आपली काहीही चूक नसताना गुन्हेगार म्हणून दोषी ठरवले जातात. या मुलांना गुन्ह्यात अडकवले गेले आहे, हे एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात येते आणि तो पोलिस अधिकारी या मुलांची यातून सुटका करतो, अशी या चित्रपटाची कथा आहे.
या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळी ज्येष्ठ अभिनेते विजय नवले, ज्येष्ठ अभिनेत्री वृंदा बाळ, संगीता चवरे, अभिषेक चवरे, सहायक दिग्दर्शक हर्ष राजे, साहाय्यक दिग्दर्शक अरबाज शेख, आरती पाटील, कुतुबुद्दीन गड्डेकर, नागेश स्वामी, आशिक राजपूत, नृत्य दिग्दर्शक शाहिद राजपूत, कास्टिंग दिग्दर्शक भैरव पवार, प्राजक्ता ठिगळे, शोभा देशपांडे, मुस्कान शेख, सलमान शेख, सतीश कुंभार, प्रॉडक्शन मॅनेजर अमजद शेख आदी कलाकार उपस्थित होते.
धारावी कट्टा या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट प्राईम पिक्चर 5 निर्माता मिथलेश अगरवाल, केतन जाधव आणि सय्यद शेख यांच्याकडे आहे.
पुण्यात धारावी कट्टा चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 18, 2022
Rating:
