सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : बल्लारपूर - बामणी मार्गावरील बामणी येथील असलेल्या महाराजा बियर बार जवळ काल शनिवार दि.१ जानोवारीला सायंकाळी ७:०० वाजताच्या दरम्यान बल्लारपूर कडून बामणीकडे जात असलेल्या स्विफ्ट गाडीने सुमोला मागुन जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातामुळे काही काळ त्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली हाेती. घडलेल्या अपघातात सुदैवाने काेणतीही जीवितहानी झाली नाही.
परंतु या अपघाताने सुमो ही रस्त्याच्या दुभाजकावर चढली हाेती. दरम्यान सुमोतील पाचही प्रवासी बालबाल ब़चावले आहे. सदरहु अपघातात स्विफ्ट वाहन चालक बचावला असुन तो गंभीर जखमी झाला आहे. त्यास स्थानिक बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यांत आल्याचे वृत्त आहे.
उपराेक्त अपघाताची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीसांनी घटना स्थळी भेट दिली. ते या घटनेबाबत अधिक चाैकशी करीत आहे.
बल्लारपूर-बामणी मार्गावरील महाराजा बियर बार जवळ स्विफ्ट-सुमोचा भीषण अपघात, एक गंभीर जखमी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 03, 2022
Rating:
