टिळक चौक येथे झालेल्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या आंदोलनकर्त्यांना माकपच्या वतीने वाहण्यात आली श्रध्दांजली

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी शहरातील टिळक चौक येथे 1974 साली झालेल्या महागाई विरोधातील आंदोलनात आंदोलनकर्त्यांवर झालेल्या गोळीबारात सात आंदोलकांना आपला जिव गमवावा लागला होता. त्या हुतात्म्यांना दरवर्षी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने श्रध्दांजली वाहिली जाते. यावर्षीही टिळक चौकातील या हुतात्म्यांची नावे कोरलेल्या स्मारका जवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात आला. त्या आंदोलनात पुढाकार घेतलेले माकप चे जेष्ठ नेते कॉ. शंकरराव दानव यांच्या हस्ते हुतात्म्यांची नावे कोरलेल्या स्मारकाला पुष्पगुच्छ वाहुन गोळीबारात मरण पावलेल्या आंदोलकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माकपचे पदाधिकारी व हुतात्म्यांचे नातेवाईक उपस्थीत होते.

तत्कालीन भारताच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या शासन काळात  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अन्य पुरोगामी पक्षांच्या वतीने महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील टिळक चौकातही माकप व अन्य पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 1974 साली झालेल्या या आंदोलनात आंदोलकांवर पोलिसांकडुन बेछूट गोळीबार करण्यात आला. पोलिसांच्या गोळीबारात सात आंदोलक मृत्युमुखी पडले. या घटनेला 2 जानेवारीला 48 वर्ष पुर्ण झाले.

दरवर्षी या हुतात्म्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात येते. यावर्षीही टिळक चौकात या हुतात्म्यांची नावे कोरून असलेल्या स्मारकाला माकप चे जेष्ठ नेते व त्या आंदोलनात सहभागी असलेले कॉ. शंकरराव दानव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ वाहुन आंदोलनात हुतात्म्य आलेल्या त्या सातही जणांना त्यांच्या नेतृत्वात श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी माकपचे पदाधिकारी व हुतात्म्य पत्कारलेल्या आंदोलनकर्त्यांचे नातेवाईक उपस्थीत होते.
टिळक चौक येथे झालेल्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या आंदोलनकर्त्यांना माकपच्या वतीने वाहण्यात आली श्रध्दांजली टिळक चौक येथे झालेल्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या  आंदोलनकर्त्यांना माकपच्या वतीने वाहण्यात आली श्रध्दांजली Reviewed by सह्याद्री चौफेर on January 02, 2022 Rating: 5
Powered by Blogger.