जेसीआय राजूरा रॉयल्सच्या वतीने उत्क्रूष्ठ कामगिरी करणांऱ्या पत्रकारांचा गाैरव !

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

चंद्रपूर : जेसीआय राजूरा राँयल्सच्या वतीने रविवार दि .१६ जानेवारीला औद्योगिक नगरी म्हणून आेळखल्या जाणा-या बल्हारपूर येथील पिडब्लूडी विश्रामगृहात पत्रकारिता क्षेत्रात विशेष व माेलाची कामगिरी बजवणां-या चंद्रपूर जिल्ह्यातील अकरा पत्रकारांना पुरस्कार व सन्मानपत्रे देवून गाैरवित करण्यांचा एक छोटा खानी कार्यक्रम पार पडला.

उपरोक्त आयोजित साेहळ्यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं व्यासपीठाचे प्रसिध्द प्रमुख तथा चंद्रपूर-गडचिराेली या जुळ्या जिल्ह्याचे पत्रकार किरण घाटे, संताेष कुंदाेजवार, सुरेश साळवे, राममिलन साेनकर, बादल बेले, श्रीकृष्ण गाेरे, फारुख शेख, भीमया बाेर्डेवार यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देवून गाैरव करण्यांत आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेसी सुशिला पुरेड्डीवार यांनी विभुषित केले हाेते तर मुख्य अतिथी म्हणून बल्हारपूर नगरीचे भूतपूर्व नगराध्यक्ष हरीष शर्मा उपस्थित हाेते. या शिवाय विशेष अतिथी म्हणून जाेन व्हॉईस प्रेसिडन्ट प्रतीक सारडा उपस्थित हाेते. तदवतचं माजी अध्यक्षा जेसी स्मृति व्यवहारे यांची देखिल कार्यक्रमाला उपस्थिती लाभली हाेतीे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राजूरा नगरीच्या जेष्ठ लेखिका तथा नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या राजुरा निवासी अधिवक्ता मेघा धाेटे, सहजं सुचलं व्यासपीठाच्या मुख्य संयाेजिका सुविद्या बांबाेडे, सुनील रामटेके उपस्थित हाेते.
काेराेनाचे सर्व नियम पाळत हा समारंभ उत्साह पुर्वक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जेसी मंजु गाैतम, तर उपस्थितीतांचे आभार मधुस्मिता पाढी यांनी मानले, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेसी जयश्री शेंडे, सुषमा शुक्ला, स्वतंत्र कुमार शुक्ला राधा विरमलवार, स्वरुपा झँवर, डॉ. माेनिषा पाटनकर, रितू पाथांरे, मनिषा पुन, या व्यतिरीक्त जेसी प्रफुला धाेपटे, लक्ष्मी प्रसाद, लता ठाकुर, शांता ठाकुर आदींनी अथक परिश्रम घेतले.  
जेसीआय राजूरा रॉयल्सच्या वतीने उत्क्रूष्ठ कामगिरी करणांऱ्या पत्रकारांचा गाैरव ! जेसीआय राजूरा रॉयल्सच्या वतीने उत्क्रूष्ठ कामगिरी करणांऱ्या पत्रकारांचा गाैरव ! Reviewed by सह्याद्री चौफेर on January 18, 2022 Rating: 5
Powered by Blogger.