सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार
सावली : सध्या गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे.त्यामुळे पक्षीप्रेमीची पाउले आपसुकच पानथडे व तलावाकडे पक्षी निरिक्षणाकरिता वळले असतांना नागभिड तालुक्यातील घोडाझरी जगंल परिसरातील किटाळी (बो.) येथिल गाव तलाव जवळ पक्षीतज्ञांना दुर्मिळ "काळा गरुड" पक्षी आढळल्याने पक्षीमित्रांत आनंद व्यक्त होत आहे. पुर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्यातील नागभिड तालुक्यातील घोडाझरी सारखे मोठे तलाव व इतर अनेक लाहान तलाव तसेच डोगंर रांगानी नैसर्गिक सुष्टीनी नटलेले निसर्गरम्य स्थळ आहे. नोव्हेबर महिण्याचे सुरवातीलाच स्थांलातरीत पक्षाच आगमन येथे होत असतो. त्यामुळे नागभिड येथिल म.गाधी विद्यालयातील पक्षीतंज्ञ डाँ जि.डी.देशमुख, यांचे मार्गदर्शनात प्रा. निखिल बोराडे, प्रा. अमोल रेवसकर, व संजय सुरजुसे पक्षीनिरिक्षणाला गेले असता.घोडाझरी परिसरालगत चिधिचक जवळील किटाळी(बो.) तलावाचे पाळीवर एका झाडावर मोठ्या आकाराचा,देखणा, व रुबाबदार पक्षी बसलेला आढळला तेव्हा त्या पक्षाचे विविध मुद्राचे फोटो कँमेरात टिपण्यात आले व त्याचा शास्त्रीय अभ्यासाअंती अतिशय दुर्मीळ आढळणारा "भारतीय काळा गरूड पक्षी" असी ओळख पटली.त्याचे शास्त्रीय नाव "इक्टिनिट्स मलाइन्सिस" असे असल्याचे पक्षितंज्ञाने सागितले.
साधारणता: हिमालय पर्वत रागांमे नैसर्गिक अधिवास असलेला हा पक्षी भारतामधे व महाराष्टात अतिशय तुरळक नोदं झाल्याचे कळते. या ऋतूमधे हिमालयात बर्फ असल्यामुळे खाद्याच्या शोधात हे पक्षी राजस्थानामधे स्थांलातर करतात तर मैदानी भागात हे पक्षी अभावानेच आढळतात. असी माहिती शास्त्रीय अभ्यासक सागतात.त्या भारतीय काळा गरुड पुर्णता: काळा असतो. त्याची चोच तळासी गडद पिपळ्या रगांची, व पाय सुध्दा पिवळ्या रगांचे पायमोचे घातल्यासारखे दिसतात.हा पक्षी शिकारी असुन सरडे, सप, उदीर, घुसी, असुन प्रसंगी लाहान पक्षाची शिकार सुध्दा करतो.निर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे त्याच्या अधिवासाला धोका निर्माण झाल्याने.असा या दुर्मिड पक्षाची संख्या कमी होत आहे.त्यामुळे वातावरणाचा समतोल ढासळत असुन असा शिकारी पक्षाच्या संर्वधनासाठी प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची गरज असल्याचे मत पक्षीतंज्ञ डाँ. जी.डी. देशमुख यांनी व्यक्त केले.
चद्रंपूर जिल्ह्यात आढळला दुर्मिळ "काळा गरुड"
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 17, 2022
Rating:
