सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : आज गुरुवारी (ता.१४) रोजी सकाळी ९:३० वाजता "तिरंगा रॅली" चे आयोजन वणी शहरात करण्यात आले आहे.
भारतीय नागरिकांमध्ये व तरूण पिढीमध्ये देशभक्तीची भावना दृढ व्हावी या हेतूने सर्व वणीकर देशभक्त नागरिकांच्या सहभागाव्दारे वणीकर नागरिक म्हणुन "तिरंगा रॅली" काढण्यात येणार आहे, यामध्ये शहरातील सर्व सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक संघटना सहभागी होणार आहे. सदर रॅली ही पद यात्रा आहे.
विश्रामगृह, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, महात्मा गांधी चौक, गाडगे बाबा चौक, काठेड ऑईल मिल चौक, सर्वोदय चौक, रविंद्रनाथ टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लोकमान्य टिळक चौक असा रॅलीचा मार्ग राहणार आहे. या रॅलीत सर्व वणी तालुक्यातील नागरीकांनी व संस्थांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान आयोजकांनी केलेले आहे.
तसेच मारेगाव तालुक्यात सुद्धा तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. येथील स्थानिकांनी रॅलीचे आयोजन केले असून सकाळी 11 वा.रॅली निघणार आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली.