रेफरच्या नादात मातेने गमावले आपले अडीच किलोचे बाळ

सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : पेंढरी उप केद्रतील कर्तव्यावर असणाऱ्या परिचारीकेच्या बेजबाबदार पणामुळे रेफरच्या नादात एका गरीब पीडित मातेला आपल्या अडीच किलोच्या गोंडस उपजत बाळास मुकावे लागले. या संदर्भात तालुका आरोग्य विभागाकडे सभपतिच्या माध्यमातून तक्रार दिल्या नतर ही महिन्याचा काळ लोटूनही दोषिवर कार्यवाही थठंबसत्यात असल्याचे दिसुन येत आहे.

सदर प्रतिनिधिनी या बाबत पीडीत मातेशी संपर्क साधला असता, आपल्या गोंडस बाळास आरोग्य सेवेच्या अपुऱ्या सोईमुळे गमावलेल्या पीडीत मातेने आपली व्यथा मांडली. त्या नुसार तालुक्यातील जवळच असलेल्या आणि चारशे लोकवास्तिच्या गावात अनु.जमातीचे वास्तव्य आहे. गावालगत जंगली भाग असल्याने नेहमीच वन्य जीवांचे दर्शन होत असते,अश्या परीस्थिती भागातील लोकांचे जीवन, पती मोलमजूरी करुण कुटुंबाचा प्रपंच चालविणाऱ्या पीडीत महिला,शिल्पा मोरेश्वर गावळे ३० वर्ष रा. पांढरसराड ही दूसऱ्यानंदा गर्भवती राहिली. परिस्थिति बेताची असूनही या कालावधीत आपले बाळ सुखरूप व्हावे. या उद्देश्याने तिने खाजगी सह सरकारी आरोग्य सेवेचा आधार घेतला. गरोदर पणाचा कालावधी पूर्ण होते वेळी ३/११/२१ रोजी पुन्हा तपासणी करुण बाळ योग्य असल्याची खात्री करुण घेतली. मात्र, २९/११/२१ रोजी पोटात दुखत असल्याने पीडीत मातेने रुग्णवाहिका अभावी खाजगी वाहनाने आई भाऊ व मामी च्या मदतीने नजीकच्या उपकेंद्र पेढरी येथे आशा वर्कर वीणा सह नेण्यात आले. त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या परिचारीकेने पीडीत मातेला कोणत्याही तपासणी वीणा रेफरचा सल्ला दिला. तोपर्यंत बाळाचे पाय बाहेर आले होते केवळ डोक फसुन असल्याने उपकेंद्र पेंढरी ते सावली ग्रामीण रुग्णालय या १० कि.मी च्या प्रवासात गुदमरुन बाळाचा सावली रुग्णालयासमोर खाजगी वाहनातच मृत्यु झाला
 आणि पीडीत मातेने उप केंद्र पेढरी येथील कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकेच्या रेफर केल्याने आपले गोंडस बाळ गमविले. सदरच बाळंतपण पेंढरी उप केंद्रात योग्य रीतीने करता आले असल्याचे सावली येथील आरोग्यकर्मचाऱ्या कडून सांगण्यात आले. मात्र, पेंढरी उपकेंद्रातील परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे उपजतबालकाचा मृत्यु झाला. त्यामुळे दोषिवर कार्यवाही करण्यात यावी. अशी पीढित मतेची मागणी आहे. घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन पं स सभापतीनी दोषी विरुद्ध तालुका आरोग्य विभागाकडे तक्रार केली. मात्र, महिन्याचा काळ लोटूनही कार्यवाही थंडबसत्यात असल्याचे दिसुन येत आहे. पोटदुखन्यापासून ते बाळंतपण या कालावधीत सदर उपकेंद्राअंतर्गत ना आशा वर्कर;ना परिचारिका; ना रुणवाहिका अशी कोणतीही सुविधा या कालावधीत पीढित मातेला मिळू शकल्या नाही. सोबतच बाळाच्या मृत्यु पश्च्यात मातेला कोणतीही साहनुभूती कर्तव्यावर असणाऱ्या आरोग्य सेवेकडून मिळू शकल्या नसल्याची खंत पीड़ित मातेकड़ून व्यक्त केली जात आहे.

 उपकेंद्रा अंतर्गत दिल्या जाना ऱ्या १ ते १६ सुविधा पैकी क्र.६. गारोधर माता नोंदणी तपासणी व उपचार ; क्र .७ प्रसूति सोय क्र.८ प्रसुतिपश्यात सेवा पैकी कोणतीही सेवा पीढित मातेला योग्य रित्या मिळू शकल्या नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे मग कर्तव्यावर कसूर करुण रेफरच्या नावावर गरीब मातेला तिच्या उपजात बालकास मुकविणाऱ्या दोषिवर कार्यवाही होणे गरजेचे आहे.
रेफरच्या नादात मातेने गमावले आपले अडीच किलोचे बाळ रेफरच्या नादात मातेने गमावले आपले अडीच किलोचे बाळ Reviewed by सह्याद्री चौफेर on January 10, 2022 Rating: 5
Powered by Blogger.