नागपूर व गडचिरोलीतील पटवारी संघाच्या आंदाेलनाला चंद्रपूर जिल्ह्यातील मंडळ अधिकारी व तलाठी संघटनेचा पाठींबा
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गाच्या न्यायीक व रास्त मागण्या निकाली काढण्याकरिता विदर्भ पटवारी संघ व मंडळ अधिकारी संघ जिल्हा शाखा नागपूर आणि विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा गडचिरोली यांनी आंदोलनाची नोटीस दिनांक 6 डिसेंबर रोजी दिलेली असून त्यानुसार निर्धारित टप्प्यानुसार आंदोलन सुरु झाले आहे. परंतु नागपूर व गडचिरोली जिल्हा महसूल प्रशासनाकडून अद्याप पर्यंत सकारात्मक प्रतिसाद दिसून येत नाही. त्यामुळे संपूर्ण तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गामधे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गास सावत्र वागणूक दिल्या जाते अशी तलाठी संघटनेची धारणा झाली आहे.
आंदोलन सुरु असतांना सुध्दा नागपूर व गडचिरोली जिल्हा महसूल प्रशासन सकारात्मक प्रतिसाद देत नसल्यामुळे विदर्भ पटवारी संघ नागपूर, चंद्रपुर, गडचिरोली जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध करित असून विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा नागपूर व गडचिरोली यांच्या आंदोलनास चंद्रपूर जिल्हा पटवारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद गेडाम, सचिव संपत कन्नाके यांचे नेतृत्वात काल पासून पाठींबा देण्यात येत असून काळ्या फीत लावून कामकाज केले जात आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महसूल तलाठी, मंडळ अधिकारी संघटनेने दिला आहे.अशी माहिती आज संघटनेचे वतीने चंद्रपूर जिल्हा तलाठी संघटनेचे जेष्ठ सदस्य सुनिल रामटेके यांनी राजूरा मुक्कामी दिली.
दरम्यान या आधी सुध्दा चंद्रपूर जिल्ह्यात तलाठी व मंडळ अधिकारी यांचे रास्त मागण्यासाठी आंदाेलने झाली आहे. त्या वेळेस विदर्भातील पटवारी व मंडळ अधिका-यांनी चंद्रपूर जिल्हा पटवारी आंदाेलनाला समर्थन दिले हाेते हे येथे उल्लेखनिय आहे.
नागपूर व गडचिरोलीतील पटवारी संघाच्या आंदाेलनाला चंद्रपूर जिल्ह्यातील मंडळ अधिकारी व तलाठी संघटनेचा पाठींबा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 08, 2022
Rating:
