राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गणित विभागातर्फे महान भारतीय गणितज्ञ श्रीवास रामानुजन यांच्या १३४ व्या जयंती निमित्त 'राष्ट्रीय गणित दिवस' साजरा करण्यात आला. या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम गणित विषयावर प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. तसेच पोस्टर स्पर्धा व सेमिनार स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील गणित विभाग प्रमुख महादेव भुजाडे उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना गणित विषयाची उपयुक्तता व संधी याबाबत मार्गदर्शन केले.
रामानुजन यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे झाल्यास देशात अनेक शास्त्रज्ञ् निर्माण होतील असा या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक प्रा अक्षय जेनेकर यांनी आशावाद व्यक्त केला. प्रश्न मंजुषा स्पर्धेत सिद्धेश्वर पायलवार, तृप्ती मेश्राम, तेजश्री मेश्राम, यांना बक्षीस मिळाले. पोस्टर स्पर्धेत तृप्ती मेश्राम, योगिनी आवारी, भारती देवाळकर यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावीला. सेमिनार स्पर्धेत वृषाली काळे, साक्षी बोढे, विनीत खोके, यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

कार्यक्रमच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयालाचे प्राचार्य डॉ अविनाश घरडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ विनोद चव्हाण हे होते. तर सूत्रसंचालन माधुरी शेंडे यांनी केले.
महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. 
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on December 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.