जनजागृती करून 'राष्ट्रीय ग्राहक दिन' साजरा करावा - सीमा स्वामी लोहराळकर

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नांदेड : 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन चार भिंतीच्या आत साजरा न करता जनजागृती करून राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात यावा. अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समितीतर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

त्यात म्हटले की, भारतात दरवर्षी ता.24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. 1986 मध्ये आजच्याच दिवशी ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला. तर, सन 1991 आणि 1993 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. या कायद्याचा जास्तीत जास्त वापर केला जावा म्हणून डिसेंबर 2002 मध्ये पुन्हा या कायद्यात दुरुस्तीकरण्यात आली.

यानंतर 15 मार्च 2003 पासून या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. तथापि, या कायद्यातसुद्धा 1987 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. परंतु, 5 मार्च 2004 रोजी याची संपूर्ण अधिसूचना देण्यात आली.

2000 मध्ये प्रथमच राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला होता. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन चार भिंतीच्या आत साजरा न करता जनजागृती करून राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात यावा. असे मत भ्रष्टाचार जन विरोधी आक्रोश समिती च्या मराठवाडा उपकार्याध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर यांनी पत्रकात केले. आजच्या दिवशी ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची माहिती मिळावी आणि ते याबाबत जागरूक व्हावेत यासाठी अनेक उपक्रम राबवले जावेत अशी मागणी आमच्या संघटनेची आहे असेही त्या पत्रकात नमूद केलं.
जनजागृती करून 'राष्ट्रीय ग्राहक दिन' साजरा करावा - सीमा स्वामी लोहराळकर जनजागृती करून 'राष्ट्रीय ग्राहक दिन' साजरा करावा - सीमा स्वामी लोहराळकर Reviewed by सह्याद्री चौफेर on December 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.