शहाबुद्दीन अजाणी यांना विमा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान प्राप्त


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : विमाधारकांना तत्पर सेवा व सर्वोत्तम कार्य या करीता सुप्रसिद्ध असलेले एलआईसी ऑफ इंडिया वणी शाखेचे अभिकर्ता शहाबुद्दीन अजाणी यांना "टॉप ऑफ द टेबल क्लब मेंबर अमेरिका" हा विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सर्वोच्च सन्मान प्राप्त झालेला आहे.

महत्त्वाचे म्हणजे अमरावती विभागाच्या 33 वर्षाच्या इतिहासामध्ये हा सन्मान प्राप्त करणारे श्री शहाबुद्दीन अजाणी हे प्रथम व एकमात्र विमा अभिकर्ता आहे.

"टॉप ऑफ द टेबल क्लब मेंबर" हा विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सर्वोच्च सन्मान असून जगातील सर्व विमा कंपनीचा समावेश असलेल्या मिलियन डॉलर राऊंड टेबल-MDRT या अमेरिकेच्या संघटने तर्फे "विशिष्ट अतिउच्च श्रेणीतील सर्वोच्च कार्य" करणाऱ्या विमा प्रतिनिधींना हा सन्मान प्रदान करण्यात येतो.
    या सोबतच 18 व्यादा MDRT मेंबरशीप प्राप्त करून विमा क्षेत्रातील विविध स्तरावरील सर्वोच्च बहुमान कार्पोरेट क्लब मेंबर, गॅलेक्सी क्लब मेंबर, झोनल लेवल सुपर स्टार एजंट, लाईफ टाईम MDRT Member असे सर्वच सन्मान शहाबुद्दीन अजानी यांनी प्राप्त केलेले आहे.     
मागील दोन वर्षापासून बाजारपेठेत मंदीचे वातावरण,कोविड- 19 व लॉकडाऊन सारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अजानी यांनी वर्ष 2021 मध्ये अल्प कालावधीत सदर यश संपादन केलेले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कार्यामुळे विविध स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
    
त्यांच्या या विक्रमी यशाकरिता एलआयसी वणी शाखेचे शाखाधिकारी प्रकाश झलके, विकास अधिकारी बि. बि. विटाळकर यांनी व शाखेच्या इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केलेले आहे.
शहाबुद्दीन अजाणी यांना विमा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान प्राप्त शहाबुद्दीन अजाणी यांना विमा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान प्राप्त Reviewed by सह्याद्री चौफेर on December 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.