सह्याद्री न्यूज | विलास पिसे
चिमूर : दिनांक 30 डिसेंबर 2021 ला खांबाळा येते सौर पंपाचे सौ लताताई पिसे सभापती पंचायत समिती चिमूर यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.
चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या खांबाळा हे गाव दोन हजार लोकसंख्येच्या वस्तीचे असून,येथील एका वाड्यातील गेल्या काही दिवसांपासून महिलांची पाणी भरण्याची अडचण होती ही बाब लक्षात घेता लताताई पिसे सभापती यांनी आपल्या पंधराव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून खांबाळा येथील हातपंपावर सौर पंप व टाकी लावून महिलांची अडचण दूर केली.
या वेळी खांबाळा येथील सरपंच काजल ननावरे, उपसरपंच मंगेश धाडसे, सदस्य अमोल गजबे, सुनील कडवे, रामभाऊ चौखे, सुनंदा खाटे, वंदना बावणे, दुर्गा चौखे व कर्मचारी आणि गावातील मंडळी उपस्थित होते.
लोकार्पण सोहळा प्रसंगी खांबाळा वासीय महिलांनी तसेच गावकरी यांनी सभापतींचे आभार मानले.
खांबाडा येथे सौर पंपाचे लोकार्पण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 31, 2021
Rating:
