सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील नेरी या गावी काल महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या पुढाकारातुन राेशन रघुनाथ कडवे व कल्याणी परसराम कामडी यांचा प्रेमविवाह पार पडला.
हे प्रेमी युगुल चिमूर या एकाच गावचे रहिवाशी असून या दाेघांचे एकमेकांवर ब-याच दिवसांपासून अतुट प्रेम हाेते.या विवाहाला प्रेमी युगुलाच्या परिवारांकडुन विरोध दर्शविला जात हाेता. परंतु प्रेमात आकंठ बुडालेल्या या प्रेमी युगुलांनी जीवनसाथी बनण्यांचे वचन घेतल्यामुळे त्यांनी थेट आंतरजातीय प्रेम विवाहासाठी नेरीच्या तंटामुक्ती समितीकडे अर्ज सादर केला.
समितीच्या पदाधिका-यांनी त्यांचे सर्व जन्मतारखेच्या दाखल्यासह इत्तर कागदपत्रांची तपासणी करुन नेरी ग्राम पंचायतच्या परिसरात विवाह लावून दिला. सध्या नेरीत या प्रेमविवाहची एकच चर्चा ऐकावयास मिळत आहे.
राेशन-कल्याणीचे अतुट प्रेम; त्यांचे जीवन साथी हाेण्याचे स्वप्न साकारले !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 30, 2021
Rating:
