सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब : जागतिक दिव्यांग दिनानिमित्य दिव्यांग जनजागृती सप्ताह अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरखर्डा येथे कला व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा दिवस दिव्यांग व्यक्तीबाबत सामान्य जनतेत जनजागृती व्हावी. दिव्यांगा प्रति संवेदना सामान्यामध्ये निर्माण व्हाव्या या उद्देशाने साजरा केला जातो.शारीरिक किंवा मानसिक घटकांच्या बिघाडामुळे सर्वसाधारण व्यक्ती प्रमाणे आपली दैनंदिन कामे ज्यांना करता येत नाही अशा व्यक्तींना आपण दिव्यांग व्यक्ती म्हणतो.
या दिव्यांग जागरूकता सप्ताह कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्माननीय सौ.उईके ताई सरपंच ग्रा. प.डोंगरखर्डा लाभल्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय अमोलजी वरसे साहेब गटसमन्वयक प.समिती कळंब, मा.हेडाउ साहेब केंद्रप्रमुख, मा.श्री भोंग सर मुख्याध्यापक प्रधान बोरी, शिक्षक सचिनजी गायकवाड सर, मा.सुभाषजी उघडे सर मुख्याध्यापक डोंगरखर्डा, सन्माननीय सुधीरजी लडके दिव्यांग विद्यार्थी पालक लाभले.
लुईस ब्रेल,हेलन केलर व महानायक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीपप्रज्वलन व पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी दिव्यांगविषयी आपले विचार व्यक्त करताना मा.वरसे साहेब यांनी दिव्यांगांना सहानुभूती नको आधार द्या त्यांच्या पंखांना बळ द्या त्यांचा आत्मविश्वास वाढवून समाजातील प्रत्येक व्यक्तीत संवेदना जागृत झाली पाहिजे असे विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सचिनजी पोटूरकर सर विशेष तज्ञ तर आभार प्रदर्शन श्री सुजित भगत सर यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विवेक गोंडे सर यांनी केले या कार्यक्रमाला दिव्यांग पालक, शिक्षक बी आर सी सम्पूर्ण टीम श्री शंकर आत्राम विशेष शिक्षक,श्री रतन गोंडे विशेष तज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता जिल्हा परिषद डोंगरखर्डा शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटण्यात आले.
डोंगरखर्डा येथे जागतिक दिव्यांग जनजागृती सप्ताह साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 07, 2021
Rating:
