सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : येथील जैताई मंदिराचे नव्वदीत पदार्पण केलेले उत्साही व क्रियाशील संचालक आणि लोकप्रिय ज्येष्ठ समाजसेवक सुधाकर पुराणिक यांचा नुकताच विविध संस्थांतर्फे भावोत्कट सत्कार करण्यात आला.
या सत्काराचे आयोजन जैताई मंदिर व जैताई अन्नछत्र समितीच्या वतीने करण्यात आले होते. त्यांच्या सत्कारार्थ यवतमाळच्या श्रीराम सुंदरकांड महिला मंडळाच्या वतीने संगीतमय सुंदरकांड पठणाचा
सुश्राव्य कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.
नव्वदाव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार,शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला,मंदिराचे सचिव माधव सरपटवार अन्नछत्र समितीचे अध्यक्ष मुन्नाभाऊ पोद्दार, विद्यावाचस्पती स्वानंद पुंड, गजानन सेवा समिती अध्यक्ष विनय कोंडावार. टिळक नगरचे प्रा. माधमशेट्टीवार आणि अनेक संस्था व व्यक्तिंनी शाल, श्रीफळ, भेटवस्तु व पुष्पमाला देऊन पुराणिक यांच्या विषयी आपली आदर भावना व्यक्त केली.
सुंदरकांड कार्यक्रमात अखंड दोन तास ढोलकीची जोशीली साथ देऊन पुराणिक सरांनी नव्वदीतील आपल्या तारुण्याची श्रोत्यांना प्रचिती आणून दिली . आपल्याला भारावून टाकणारा हा कार्यक्रम व वणीकरांचे प्रेम आपण कधीच विसरु शकणार नाही असे सत्कार मूर्ती सत्कारार्थ उत्तर देतांना म्हणाले.
नव्वदीच्या तरुणाचा भावोत्कट सत्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 02, 2021
Rating:
