उद्यापासून मारेगावात भव्य हॉलीबॉलचे खुले सामने


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा मंडळ च्या वतीने मो.जावेद मो.यासीन पटेल व स्व.अशोक आरेवार यांच्या स्मूर्ती प्रित्यर्थ शहरातील ओम श्री पार्क स्टेडियम, मारेगाव मार्डी रोड ला दिनांक 3 ते 5 डिसेंबर या दरम्यान, (दिवस-रात्र) डे नाईट डायरेक्ट रट्टा हॉलीबॉल चे भव्य खुले सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये प्रथम बक्षिस स्व.श्रद्धाताई नांदेकर यांचे स्मूर्ती प्रित्यर्थ माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे तर्फे 31,016/-, द्वितीय बक्षिस मो.जावेद मो.यासिन पटेल यांच्या स्मूर्ती प्रित्यर्थ इजहार शेख यांचे चे तर्फ 25,016/-, तृतीय बक्षिस मो.जावेद मो.यासिन
स्मूर्ती प्रित्यर्थ जुबेर पटेल यांचे तर्फ 21,016/-, चतुर्थ बक्षिस  अरविंद ठाकरे (लकी बार अँड रेस्टॉरंट) यांचे तर्फ 15,016/-, पाचवे बक्षिस आकाश बिल्डिंग मटेरियल संचालक अविनाश सुभाष मत्ते यांचे तर्फ 11,016/- तर, सहावे बक्षिस तुळशीराम बार अँड रेस्टॉरंट संचालक तुळशीरामजी डोळस यांचे तर्फे 7,016/- असे भव्य लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आले असुन, बेस्ट शॉटर, बेस्ट नेटर, बेस्ट सेंटर, मॅन ऑफ द टूर्नामेंट व बेस्ट प्लेअरंना आकर्षक बक्षिसांची मेजवानी असणार आहे. प्रवेश फी 716/- तर,तक्रार फी 1616/- रुपये भरावी लागणार आहे. तसेच सामने नियमानुसार खेळविल्या जाईल, पंचाचा व मंडळाचा निर्णय अंतिम राहील,संघ वेळेवर उपस्थित न झाल्यास तो बाद करण्यात येईल, खेळाडूच्या रक्षणाची जबाबदारी स्वतः त्यांचेवर राहील,एका खेळाडूला एकाच संघात खेळता येईल,नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही. वरील प्रमाणे नियम व अटी सुद्धा लागू असणार आहे.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ महेंद्र लोढा राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस, हे राहणार आहेत तर, उद्घाटक म्हणून  माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर तर, वामनराव कासावार माजी आमदार तथा काँग्रेस महाराष्ट्र राज्य कमिटी सचिव हे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाचे राहणार आहेत.

उद्यापासून मारेगावात भव्य हॉलीबॉलचे खुले सामने उद्यापासून मारेगावात भव्य हॉलीबॉलचे खुले सामने Reviewed by सह्याद्री चौफेर on December 02, 2021 Rating: 5
Powered by Blogger.