सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : वणी तालुका हा विविधतेनं नटलेला तालुका म्हणून नावारूपास आला आहे. विविध कलागुण जोपासतांनाच अनेकांनी विविध क्षेत्रात उंच भराऱ्या घेतल्या आहेत. लेखक, साहित्यिक, कवि, विचारवंत, गायक, कलाकार व गीतकारही वणीच्या मातीतून निपजले आहेत. क्रीडा क्षेत्रातही अनेकांनी आपले नाव गाजवले आहे. त्यामुळे वणीला कलागुणांची खान असं संबोधल्या जातं. क्रीडा क्षेत्रही गाजविलेले येथील अनेक प्रतिभावंत खेळाडू आज राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. क्रीडा क्षेत्रात भविष्य घडवू पाहणाऱ्या खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना तयार करून त्यांच्यातला उत्तम खेळाडू घडविण्याचं महत्वकांक्षी कार्य काही क्रीडाप्रेमींनी हाती घेतलं आहे. त्याच धेय्यवेड्या क्रीडाप्रेमींमधील एक नाव म्हणजे गौतम जीवने हे आहे. क्रिकेटचा प्रचंड छंद असलेल्या या तरुणाने अनेक क्रिकेट स्पर्धा गाजविल्या आहेत. राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने तयार केलेल्या खेळाडूंच्या संघाने अनेकदा विजय मिळविला आहे. क्रिकेट प्रतियोगीतांमध्ये अजिंक्य राहण्याचा अनेकदा त्याच्या नेतृत्वातील संघाने मान मिळविला आहे. क्रिकेटचा छंद जोपासणारे अनेक खेळाडू त्याने घडविले आहेत. त्याने तयार केलेल्या खेळाडूंनी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. कित्येक क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने निवडलेल्या खेळाडूंच्या संघाने बाजी मारली आहे. नुकत्याच चिखलदरा येथे झालेल्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने तयार केलेले खेळाडू चमकले. त्याने निवडलेल्या खेळाडूंचा संघ वयोगट १७ मुलींमध्ये प्रथम राहिला तर मुलांनी वयोगट १७ मध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशन यवतमाळ व जी.पी. टेनिसबॉल क्रिकेट ओसीएशन वणी यांच्या माध्यमातून हे क्रिकेट संघ चिखलदरा येथे पाठविण्यात आले. जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव गौतम जिवने यांनी निवडलेल्या खेळाडूंच्या संघाने विजय संपादन केल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्यस्तरावरील क्रिकेट स्पर्धेत विजय संपादन करून यवतमाळ जिल्ह्याची मान गर्वाने उंचाविली आहे. संघाने मिळविलेल्या यशात जी.पी. टेनिसबॉल असोसिएशनचे सचिव प्रितेश लोणारे, कोच अविनाश उईके, पल्लवी पेंदाम, फाउंडर मेंबर शाहिद शेख, मुकुंद काकडे, मॅनेजर अर्पिता व यवतमाळ टिमचाही मोठा वाटा आहे. १७ वयोगटातील मुलीच्या संघाने प्रथम तर याच वयोगटातील मुलांच्या संघाने दुसरा क्रमांक पटकावल्याने यवतमाळ जिल्ह्याची मान उंचावली असून मानाचा चषक यवतमाळ जिल्ह्याला मिळाला आहे.