लाठी (बेसा) येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यातील लाठी (बेसा) या गावातील एका २५ वर्षीय युवकाने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल १२ डिसेंबरला सायंकाळी उघडकीस आली. शिरपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतदेहावर आज शवविच्छेदन झाल्यानंतर मुतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. पंकज चेतन खिरटकर (२५) असे या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून एकांतवासात रहात असलेल्या या युवकाने खालावलेल्या मानसिकतेतून आत्महत्या केल्याची गावात चर्चा आहे. कुटुंबातील सर्व जण शेतात गेले असता त्याने संधी साधून राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. मुलाने आत्महत्या केल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. 
त्याच्या आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्यापही कळू शकले नसून पोलिस त्या दिशेने तपास करीत आहे.
लाठी (बेसा) येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या लाठी (बेसा) येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on December 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.