टॉप बातम्या

मंजूर कामे तातडीने सुरु करा- यंग चांदा ब्रिगेडची मागणी


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : शहरातील इंदिरा नगर येथील हनुमान टेकडी परिसरात नागरिकांच्या मागणी नंतर अनेक कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. परंतु प्रत्यक्षात अद्यापही सदरहु कामांना सुरूवात झालेली नाही. त्यामूळे मंजूर सर्व कामे तात्काळ सुरु करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या इंदिरानगर शाखेच्या वतीने करण्यात आली असून सदरहु मागणीचे निवेदन अतिरिक्त उपआयुक्त विपीन पाल यांचे मार्फतीने महानगर पालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांना आज देण्यांत आले यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, नरेश मुलकावार, तापोश डे, हेरमन जोसेफ, शकील शेख, बंडू पटले, नितेश गवळे, फुलचंद पाटील, सिद्धार्थ मेश्राम, गणेश किन्निकर, नितेश बोरकुटे आदींची उपस्थिती होती.          
  
इंदिरा नगर परिसरातील हनुमान टेकडी येथे विविध समस्या आहेत. त्यामूळे या समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली होती. या करिता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा अधिका-र्यांना वांरवार निवेदनही देण्यात आले आहे. याची दखल घेत मनपा उपायुक्त यांच्या मार्फतीने सदरहु परीसराची पाहणी करून अहवाल मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना सादर करण्यात आला होता. त्यानंतर १५ दिवसात सदरहु कामे सुरु करू असे मनपाच्या वतीने आश्वासित करण्यात आले होते. मात्र, आता 2 महिण्यांचा कालावधी लोटून सुध्दा मंजूर कामे सुरु झालेली नाही. त्यामूळे येथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची गांभिर्याने दखल परिसरातील मंजूर कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी सदरहु निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेड तर्फे करण्यात आली आहे.
Previous Post Next Post