सह्याद्री न्यूज नेटवर्क |
झरी : संभाजी ब्रिगेड झरी तालुक्याच्या वतीने मुकुटबंन येथे ई-श्रम कार्ड शीबिराचे आयोजन केले होते. असंघटित श्रेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी सरकार कडून अनेक विधायक पाऊले उचललेली जात आहे. अश्या सर्व लोकांसाठी ई श्रमिक कार्ड योजना लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत कामगारांना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. सरकारी योजने पासून एकही कामगार वंचित राहू नये यासाठी संभाजी ब्रिगेडने या शिबिराचे आयोजन केले होते.
सरकारी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ई-श्रम पोर्टल वर नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर देशातील कोनात्याची काना कोपऱ्यात काम करणाऱ्या कामगारांना विविध सरकारी योजणांचा लाभ घेता येणार आहे. प्रत्यक्षात हे कार्ड 16 ते 59 वयोगटातील कामगारांसाठी असून रजिस्ट्रेशन ऑनलाईन ऑफलाईन करता येणार आहे. अर्ज न करता योजनेपासून वंचित राहू नये यासाठी हा कॅम्प मुकुटबंन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित करून नोंदणी ची सुविधा उपलबध करून दिली होती.
शिबिराचा कार्यक्रमाचे अध्यक्ष नितेश ठाकरे, उद्घाटक पी एस आई राजेश मदेवार (धंतोली नागपूर पोलीस स्टेशन), प्रमूख पाहुणे राजू लोडे, उपस्थिती समीर लेनगुडे (संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष यवतमाळ), देव येवले (संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष), केतन ठाकरे (तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ), शंकर झाडे (शाळा सुधार समिती अध्यक्ष) अशोक पणघाटे (माजी ग्राम पंचायत सदस्य), प्रफुल भोयर (रक्तविर बहुउद्देशीय संस्था) आशिष झाडे अध्यक्ष (शिवाक्रांती कामगार संघटना ), सुरज सुरपाम यांचा उपस्थिती त पार पडला.
कार्यक्रमाचे संचालन शुभम राऊत यांनी केले. तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुमित क्षीरसागर, मंगेश झाडे, संदीप आसुटकार, लखन कांबळे, दीपक हिरादेवे, विवेक सोनटक्के, प्रशांत बोबडे, दिलीप पाचभाई, आकाश पारखी, संदीप येवले, गौरव धोटे, गणपत गेडाम, प्रणय काळे, आदींचे सहकार्य लाभले.
ई-श्रम कार्ड नोंदणी शिबिराचा कामगारांनी घेतला लाभ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 27, 2021
Rating:
